शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कायदा-सुव्यवस्थेसाठी सोशल पोलिसिंग

By admin | Updated: December 23, 2016 00:10 IST

पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाललेल्या घडामोडींची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी

चाकण : पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाललेल्या घडामोडींची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप निर्माण करून त्यामध्ये समाजाच्या विविध क्षेत्रांतील १०० सदस्यांना सामावून घेण्याचे आदेश कोल्हापूर दूरक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्याअनुषंगाने चाकण पोलीस ठाण्यात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर परिक्षेत्रातून आयजी १००, उपविभागीय पातळीवर स्टार खेड १०० व पोलीस ठाणे पातळीवर पीएस १०० ग्रुप तयार करण्यासाठी विशेष बैठक झाली. या ग्रुपमध्ये खासदार, आमदार, ज्येष्ठ नागरिक, महिला, पोलीस पाटील, पत्रकार, नगरसेवक, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, ग्रा.पं. सदस्य, वकील, डॉक्टर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी-विद्यार्थिनी, कामगार, सामाजिक संस्था आदींचा समावेश करण्यात आला आहे.या वेळी खेड पोलीस उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे यांनी या ग्रुपचे महत्त्व पटवून दिले. कायदा-सुव्यवस्था राखणे, माहिती प्रसारण करणे, माहितीची देवाणघेवाण करणे, अपघात व घटनांची माहिती, गुन्हेगारी रोखणे आदींसाठी या ग्रुपचा उपयोग होणार आहे. थोडक्यात पोलिसांचे कान, नाक, डोळे म्हणून या ग्रुपने काम करायचे आहे, असे घट्टे यांनी सांगितले. या वेळी उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे यांच्यासह पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, उपनिरीक्षक श्रीधर जगताप, महिला दक्षता समितीच्या उपाध्यक्षा मंगल देवकर, संध्या जाधव, जि. प. सदस्या सुरेखा ठाकर, पं. स. सदस्य सोमनाथ दौंडकर, माजी सभापती कल्पना पाटील गवारी, सदस्य अमृत शेवकरी, नगरसेवक प्रवीण गोरे, शेखर घोगरे, चाकण फेडरेशनचे सचिव दिलीप बटवाल, पी.के. फाउंडेशनच्या सचिव नंदाताई खांडेभराड, पत्रकार प्रतिनिधी हनुमंत देवकर, हरिदास कड, अविनाश दुधवडे, सुनील ओव्हाळ, पाटील गवारी, दशरथ काचोळे, उपसरपंच प्रकाश खराबी, दीपक नाणेकर, यांच्यासह विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते, विद्यार्थिनी उपस्थित होते. या बैठकीत लग्न समारंभातील चोऱ्या रोखण्यासाठी ज्या मंगल कार्यालयांमध्ये मोठी पार्किंग व्यवस्था, सीसी टीव्ही, रखवालदार आदी सुविधा नसल्यास त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येईल, असे सांगितले. तसेच, पुणे-नाशिक महामार्गावरील मोई फाट्यावर तोडलेल्या दुभाजकामुळे वळताना मोठे कंटेनर अडकून पडतात व वाहतूककोंडी होते. हे दुभाजक बंद करण्याची मागणी पाटील गवारी यांनी केली. तसेच, महामार्गालगत उभे केलेले कंटेनर चालकांवर व महामार्गावर नव्याने टाकलेले दगडी दुभाजक काढणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले. (वार्ताहर)