शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक असमतोल धोकादायक

By admin | Updated: February 6, 2017 05:54 IST

जागतिकीकरणात देशात आर्थिक उलाढाल वाढली. परंतु, त्याचा फायदा १५ टक्के श्रीमंतांना झाला. गरीब-श्रीमंतीचा असमतोल दूर झाला नाही.

बारामती : जागतिकीकरणात देशात आर्थिक उलाढाल वाढली. परंतु, त्याचा फायदा १५ टक्के श्रीमंतांना झाला. गरीब-श्रीमंतीचा असमतोल दूर झाला नाही. त्यामुळे भविष्यात देशातील कामगार, दलित, शोषित बंड करून उठेल, हे भारतीय लोकशाहीसमोर मोठे आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.बारामतीमध्ये आयोजित रमाई व्याख्यानमालेत मुणगेकर बोलत होते. सतत वाढणारी गरीब-श्रीमंतीची दरी अडचणीची ठरत आहे. जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. विविध जाती, पंथ, धर्म असताना संसदीय प्रणालीचा आत्मा असणारा हा खंडप्राय देश केवळ राज्यघटनेमुळेच एकसंध आहे. परंतु, अलीकडच्या काळात वाढलेली असहिष्णूता देशासमोर मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर स्त्रियांवरील अत्याचार, धार्मिक तेढ आणि सर्वांत महत्त्वाचे मतदानासाठी मतदाराला पैशाची अपेक्षा ठेवण्याचा प्रकार हा धोकादायक आहे. याच व्याख्यानमालेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारे आहे. बाबासाहेबांनी स्त्रियांना प्रसूतीची पगारी रजा देशातील सर्वधर्मीयांबरोबरच शेतकरी, शेतमजुरांचा विचार केला. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र कायद्याची मागणी केली. नदीजोड प्रकल्प हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यांच्याच काळात मोठी धरणे झाली. नदीजोड प्रकल्प कार्यान्वित झाले असते तर आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, असे ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी या वेळी सांगितले. डॉ. मंगल ससाणे, प्रा. डॉ. मिलिंद कांबळे, प्रा. डॉ. प्रदीप सरवदे, डॉ. करुणा कांबळे यांचा पीएचडी पदवी मिळविल्याबद्दल गौरव करण्यात आला. त्याचबरोबर माजी प्राचार्य तथा विचारवंत डॉ. एस. पी. कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी पांडुरंग शेलार, प्रा. महेंद्रकुमार साळवे यांची भाषणे झाली. प्रा. बालाजी कांबळे, प्रा. राजेंद्र चाटसे, प्रा. ज्योती चव्हाण, डॉ. निलकंठ ढोणे, डॉ. विलास आढाव, नगरसेवक सचिन सातव, संजय मोरे, धनपाल भोसले यांच्यासह माता रमाई आंबेडकर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)