शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

... तर कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी ईडी कार्यालयावर मोर्चा काढू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 19:14 IST

सध्या देशात सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या विरोधकांच्या मागे सीबीआय, (अंमलबजावणी संचालनालय) ईडीमार्फत चौकशी लावली जात आहे.

पुणे  : सध्या देशात सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या विरोधकांच्या मागे सीबीआय, (अंमलबजावणी संचालनालय) ईडीमार्फत चौकशी लावली जात आहे. त्यामुळे विरोधक भयभीत झाले आहे. तसेच सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक झालेल्या कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी संबंधित दोषींवर ईडी मार्फत चौकशी न झाल्यास लवकरच ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.     पुण्यात विविध पुरोगामी पक्ष, संघटनांनी एकत्र येत प्रजा लोकशाही परिषद या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीची घोषणा करताना ते बोलत होते. बेरोजगारी, महापुराचे संकट, कर्ज माफी, तरुणांना किती रोजगार दिले. शासकीय योजना किती यशस्वी झाल्या. यावर महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील अशी अपेक्षा होती. मात्र यावर एकही शब्द बोलत नाहीत. यामुळे मुख्यमंत्र्यांना अनेक ठिकाणी रोषाला सामोरे जावे लागले आहे. तर ही महाजनादेश यात्रा नसून जनतेवर लादलेली यात्रा आहे. अशा शब्दात  राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेवर टीका केली.       बारा बलुतेदार अठरा अलुतेदार व भटके, ओबीसी अशा वंचित घटकांना  हक्क, न्याय मिळावा.  यासाठी परिषेदेच्या माध्यमातून चळवळ उभी करणार आहोत. तसेच ही अराजकीय आघाडी असली तरी, यातील प्रत्येत घटकानुसार जे ते नेते विधानसभा निवडणुकीला समोरे जाणार आहेत. जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकारण करणाऱ्या पक्षांच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. परिषेदेचा मेळावा  येत्या २० सप्टेंबर पुण्यात घेतला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. निवणुकीमध्ये नक्कीच परिषद परिणाकारक ठरले, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुक स्वाभिमानी पक्ष लढविणार का या प्रश्नावर उत्तर ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेना या जातीवादी पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी राज्यातील छोटे छोटे पक्ष एकत्रित करून महाआघाडी करूनच आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.पाकिस्तानवर भाजपचे विशेष प्रेमकांद्याचे भाव दोन रुपये किलो असताना, कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली, त्यावेळी सरकार कुठे होते. आताही शेतकऱ्यांना २३ रुपयांवर भाव मिळत नाही, तर रिटेलमध्ये कांदा ३९ रुपये किलोला विकला जातो, याची सरकारने माहिती घ्यावी. शेतकाऱ्यांना दोन पैसे मिळत असताना सरकारने कांदा आयात करू नये. कोणत्याही देशातून कांदा आयात करण्यास आमचा विरोध आहे. मात्र, या सरकारला पाकिस्तानचा कांदा, साखर गोड लागते. त्यामुळे सरकारचे पाकिस्तानवर विशेष प्रेम दिसून येते, इम्रान खान यांचे हात बळकट करत आहात का? असा सवाल शेट्टी उपस्थित केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत