शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

...तर ओबीसी आरक्षणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:05 IST

लढावेच लागेल - भुजबळ \Sलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाविकास आघाडीचे सरकार असो की, फडणवीस सरकार आम्ही मराठा आरक्षणाला ...

लढावेच लागेल - भुजबळ

\Sलोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार असो की, फडणवीस सरकार आम्ही मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. मात्र, मराठा समाजातील काही नेते म्हणतात की, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे. कोणी म्हणतंय आम्ही ओबीसीच नाही, त्यांना बाहेर काढा आणि मराठ्यांना ओबीसीत घ्या. अशा परिस्थितीत संघर्ष निर्माण होण्यासारखे वातावरण आहे. आपल्या आरक्षणावर, हक्कांवर गदा येत असेल, तर लढायलाच लागेल. महात्मा फुलेंनी आपल्याला लढायला शिकवले. त्यासाठीची प्रेरणा आज इथून घेऊन जायचे आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

आज ५४ टक्के ओबीसी आहेत, असे सांगून भुजबळ म्हणाले की, आम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. फक्त ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये; पण मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य असतात. ते अडचणी आणतात. मराठा आरक्षणला पाठिंबा असूनही हा विषय वेगळ्या दिशेने सरकत असेल, तर त्याविरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावे लागेल.

जातीच्या भांडणातून बाहेर पडणार का?

दगडूशेठ गणपतीसमोर १० हजार महिला एकत्र येऊन एकसुरात अथर्वशीर्ष म्हणतात. ही चांगली गोष्ट आहे; पण त्यातील एकीलाही असं वाटत नाही? की तिथून पुढेच भिडेवाडा आहे. जिथे महिलांची पहिली शाळा महात्मा फुलेंनी सुरू केली. ते आपलं प्रेरणास्थळ आहे. जात आणि राजकारणासाठी भांडणे केली जातात. त्यातून आपण बाहेर पडणार की नाही, असा सवाल भुजबळ यांनी केला.

-------

कोरोनाबाबत भ्रमात राहू नका

कोरोना होणार नाही. या भ्रमात कुणीही राहू नका. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो. कोविड-१९ वर अजून लस यायची आहे; पण सध्यातरी मास्क हीच आपली लस आहे, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.