याबाबत ६७ वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांची मैत्रिण या शुक्रवारी सकाळी फिरण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान कर्वेनगर येथील स्टुडीओ इंटेरीअर बंगलोसमोर आल्यानंतर दोन चाेरटे मोटारसायकलवरून पाठीमागून त्यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादींच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याची भोरमाळ हिसकावून नेली. फिर्यादींनी आरडा-ओरडा केला. पण, तोपर्यंत चोरट्यांनी पळ काढला होता. सहायक पोलिस निरीक्षक डी. डी. गाडे अधिक तपास करत आहेत.
ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:04 IST