शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंश, सापांच्या पूजेबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:23 IST

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या युवकांनी सर्पदंश, उपचार, सापांची पूजा आदी विषयांवर जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

बारामती : नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या युवकांनी सर्पदंश, उपचार, सापांची पूजा आदी विषयांवर जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ५ हजार माहितीपत्रके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात या मािहतीपत्रकांचे वितरण करण्यात येणार आहे.सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार मिळणे आवश्यक आहे. साप विषारी, बिनविषारी ओळखता येत नसल्यास त्याला शोधून पकडण्याचा अथवा मारण्याचा प्रयत्न करूनये. १0 ते २0 सेकंदाहून अधिक वेळ लागणार असल्यास, सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यास सुरुवात करावी. सर्पदंश झालेल्या व्यक्तीसमोर आरडाओरडा करू नये. त्यामुळे त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडण्याचा धोका असतो. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला हालचाल करू देऊ नये.सर्पदंशानंतर आवळपट्टी करण्यासाठी कोणत्याही कपड्याचा, रुमालाचा वापर करावा. सर्पदंश झालेली जागा जंतुनाशकाने स्वच्छ करावी. जखम कापण्याची माहिती नसल्यास कापू नये, ते घातक ठरू शकते. नाग किंवा मण्यार चावल्यास आवळपट्टी वापरावी.इतर विषारी सर्पदंश झाला असल्यास आवळपट्टी वापरू नये, सर्पदंश हाताला झाल्यास आवळपट्टीने आवळून दंडाला बांधावे. दंड व दोरीमध्ये पेन किंवा पेनाच्या जाडीची काठी अथवा बोट टाकून बांधावे. त्यानंतर घातलेली वस्तू बाहेर काढावी.दवाखान्यात नेताना दरदहा मिनिटांनी गाठ १० ते २० सेकंदासाठी सैल करावी, असेआवाहन नेचर फें्रड्स आॅर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आले आहे. सर्पदंशाचे विष मंत्रोपचार, झाडपाला, धार्मिक विधीनेउतरत नाही. त्यामुळे अशा अंधश्रद्धामध्ये वेळ घालवू नये, याबाबत ठळकपणे जनजागृती करण्यात येणार आहे....नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्र नजर ठेवणारनागपंचमी दिवशी काही जण नाग घेऊन दारोदारी फिरतात. दूध, लाह्याला पैसे मागतात. नागाची पूजा केली जाते. हा प्रकार चुकीचा आहे.यामध्ये अनेकदासापांचा मृत्यू होतो. यंदा त्यासाठी शहर आणि परिसरात ४० सर्पमित्र नजर ठेवणार आहेत.नागाला आणून गैरप्रकार करणाºयाला तातडीने पकडून वनविभागाच्या मार्फत पोलिसांच्या ताब्यातदेणार आहे.