शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटांमध्ये धुमश्चक्री

By admin | Updated: April 10, 2017 03:00 IST

लोहियानगर येथे दोन गटांमध्ये पूर्वीच्या भांडणांवरून जोरदार हाणामारी झाली. कोयता, बॅट,

पुणे : लोहियानगर येथे दोन गटांमध्ये पूर्वीच्या भांडणांवरून जोरदार हाणामारी झाली. कोयता, बॅट, गावठी कट्ट्याने मारहाण झाल्याने दोन्ही गटांतील काहीजण जखमी झाले. याप्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट झाली. पोलिसांनी त्यातील काहींना अटक केली.शुक्रवारी सायंकाळी ६च्या सुमारास हा प्रकार झाला. आकाश कोळी (वय १९, एकबोटे कॉलनी, घोरपडे पेठ) याला शिवराय चौकात अडवून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले. बांबूने त्याला मारहाण करण्यात आली. ही भांडणे सोडविण्यासाठी गणेश हलवाई, रितेश महापात्रा, राहुल मिसाळ हे गेले असता त्यांनाही कोयत्याने वार करून बॅट आणि बांबूने मारण्यात आले. यात तिघांच्या डोक्यावर कोयत्यामुळे जखमा झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या प्रकरणात आकाश कोळी याच्या फिर्यादीवरुन १६ वर्षांच्या मुलासह अतुल प्रभाकर नाडे, त्याचा भाऊ शतुल, लखन भोलेनाथ मिसाळ, निखिल विश्वास थोरात व अन्य २ ते ३ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले. एकूण ८ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन मुलांचा त्यात समावेश आहे. तीन जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.या हाणामारीनंतर अर्ध्या तासाने त्याच चौकात बसलेल्या निखिल थोरात (वय २०, लोहियानगर), लखन मिसाळ, अतुल नाडे, शतुल नाडे, करण पवार यांना वेगासेंटर येथे पूर्वी झालेल्या भांडणांवरून गणेश अशोक हलवाई (वय १८), रितेश उर्फ छोटू महापात्रा (२१), राहुल विष्णू मिसाळ (१८), आकाश किसन कोळी (१९ सर्व जण राहणार लोहियानगर) यांनी बांबूने मारहाण केली. ४रितेश याने गावठी कट्टा निखिल थोरात याच्यावर रोखून त्याला ठार करण्याची धमकी दिली. या सर्वांना अटक करण्यात आली असून, अपूर्व उर्फ मोन्या संजय खंडागळे, तौहित काझी, रोहित सोनवणे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.