शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट धोरणांची गरज

By admin | Updated: March 22, 2016 01:53 IST

जागतिक हवामान बदलामुळे आपण वापरत असलेल्या नैसर्गिक स्रोतांचा किती वापर करायचा, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शाश्वत विकासाठी स्मार्ट सिटीतील तंत्रज्ञानापेक्षाही स्मार्ट

पुणे : जागतिक हवामान बदलामुळे आपण वापरत असलेल्या नैसर्गिक स्रोतांचा किती वापर करायचा, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शाश्वत विकासाठी स्मार्ट सिटीतील तंत्रज्ञानापेक्षाही स्मार्ट धोरणे तयार करून ती राबवणे अधिक आवश्यक आहे, असे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी व्यक्त केले.शारदा शक्ती या महिला संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या २५ व्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात ‘पुणे : स्मार्ट शहर’ या विषयावर डॉ. कर्वे बोलत होत्या. या वेळी शारदा शक्तीच्या राष्ट्रीय सचिव डॉ. लिना बावडेकर, डॉ. राजश्री कशाळकर उपस्थित होत्या. शारदाशक्तीच्या पुणे शाखेने दोन वर्षांपूर्वी विज्ञान कट्टा हा व्याख्यानाचा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यातील २५वे व्याख्यान स्मार्ट सिटी या विषयावर आयोजित करण्यात आले होते.त्या म्हणाल्या, की पुणे शहरातील दळणवळण आणि पाणीपुरवठा या दोन प्रकल्पांना शहर पातळीवर प्राधान्य असल्याचे केंद्राला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. त्यासाठी सुमारे तीन हजार कोटींचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. स्मार्ट सिटीसाठी औंध-बाणेर-बालेवाडी भागाची निवड केली असून, या एकूण निधीतील ७५ टक्के खर्च या भागावर तर २५ टक्के खर्च अन्य शहरात करण्यात येणार आहे. मात्र, खर्चवसुलीसाठी सरचार्ज लावला तर तो फक्त त्या सेवा घेणाऱ्या नागरिकांना असेल की पूर्ण शहरातील सर्वांना द्यावा लागेल, याबाबतही संदिग्धता आहे. पुण्यात पीएमपीएमएल या कंपनीचा अनुभव जमेस असताना पुन्हा एकदा स्मार्ट सिटीसाठी विकासाचे हक्क स्वतंत्र कंपनीला देण्यात येणार आहेत, असे सांगून कर्वे म्हणाल्या, की या कंपनीवर महापालिकेचे नियंत्रण असणार नाही तर संचालक मंडळाचेच म्हणजे अधिकाऱ्यांचे नियंत्रण असेल. पीएमपीएमएलवर अधिकाऱ्यांचे नियंत्रण असूनही त्याचे म्हणावे तसे परिणाम का दिसत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.