शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट पुणे होईना स्वच्छ

By admin | Updated: May 5, 2017 03:14 IST

कचऱ्याचा प्रश्न पेटल्याने संपूर्ण शहराला कचराकुंडीचे स्वरूप येण्याची भीती निर्माण झाली असताना स्वच्छतेच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर

पुणे : कचऱ्याचा प्रश्न पेटल्याने संपूर्ण शहराला कचराकुंडीचे स्वरूप येण्याची भीती निर्माण झाली असताना स्वच्छतेच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर पुण्याची कामगिरी चांगली झाली आहे. मात्र, गेल्या वर्षीपासून स्मार्ट सिटी योजना सुरू होऊनही महापालिका प्रशासनाला केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात मात्र उल्लेखनीय कामगिरी करून दाखवता आलेली नाही. देशातील अन्य शहरांच्या तुलनेत मागील वर्षी असलेला ११ वा क्रमांक याहीवर्षी पुणे शहराने कायम राखला. पुढचा क्रमांक मिळवण्याची मनीषा प्रशासनाला प्रत्यक्षात आणता आलेली नाही.केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील शहरांचे स्वच्छ शहरे या निकषातंर्गत सर्वेक्षण करण्यात येते. क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया या संस्थेच्या वतीने देशभरातील मेट्रो शहरांचे यात सर्वेक्षण केले जाते. घनकचरा व्यवस्थापनासाठी केलेली उपाययोजना, त्यातील उल्लेखनीय प्रयोग, त्यांची यशस्विता, शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, असे काही निकष लावून हे सर्वेक्षण करण्यात येते. कचरा डंप करण्याची मर्यादा संपणारसलग १८ दिवस कचरा हा कचरा डेपोमध्ये नेता आला नसला तरी वेगवेगळ्या प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कचरा डंप करण्यात येत आहे. दिशा तसेच अजिंक्य प्रकल्पांच्या जागेत हा कचरा नेण्यात येत आहे. मात्र आता या प्रकल्पांची कचरा सामावून घेण्याची क्षमता पूर्ण होत आली आहे. कचरा डेपोची समस्या आणखी काही दिवस अशीच लांबणीवर पडत राहिली तर शहरात लवकरच कचरा साचून राहील. अवकाळी पाऊस झाला तर ही समस्या शहराला साथीच्या आजारांकडे घेऊन जाण्याची दाट शक्यता आहे. क्रमांक अकरावा  की तेरावा ?मागील वर्षी पुणे शहर या यादीत ११ व्या क्रमाकांवर होते. यावेळी एकूण ५०० शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यात देशातील लहान शहरांचाही (३ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या) समावेश होता. त्यातही पुणे शहराला १३ वा क्रमांक मिळाला. मात्र ११ व १२ या क्रमाकांवर लहान शहरे आहेत, त्यामुळे मेट्रो सिटीमध्ये पुण्याचा क्रमांक ११ वाच आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.