शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग ६७मध्ये ‘मी स्मार्ट’ सेवा

By admin | Updated: July 14, 2016 00:57 IST

केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी योजनेच्या कामांची शहरात सुरुवात होण्यापूर्वीच माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रभाग क्रमांक ६७ मध्ये स्मार्ट सेवा सुविधांचा पहिला टप्पा कार्यान्वित केला आहे

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी योजनेच्या कामांची शहरात सुरुवात होण्यापूर्वीच माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रभाग क्रमांक ६७ मध्ये स्मार्ट सेवा सुविधांचा पहिला टप्पा कार्यान्वित केला आहे. यामध्ये अत्याधुनिक बसस्टॉप, सिटीजन पोर्टल, मोबाइल अ‍ॅप, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, स्मार्ट डस्टबिन आदी सुविधा पुरविल्या जात आहेत.प्रभाग क्रमांक ६७ मध्ये पुरविण्यात आलेल्या स्मार्ट सेवांच्या पहिल्या टप्प्याचे येत्या शनिवारी (ता. १६) लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून काही निवडक शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना राबविली जात आहे. त्यामध्ये पुणे शहराचा समावेश करण्यात आला आहे. या स्मार्ट सिटीअंतर्गत ज्या सेवा-सुविधा दिल्या जाणार आहेत, त्या प्रभाग ६७ मध्ये त्यापूर्वीच उभारण्यात आल्या असून, हा प्रभाग राज्यातील पहिला स्मार्ट प्रभाग बनल्याचा दावा आबा बागुल यांनी केला आहे. बागुल यांनी सांगितले, ‘‘स्मार्ट सिटी योजनेसाठी एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना केवळ ९० लाख रुपयांत प्रभाग स्मार्ट करण्यात आम्हाला यश आले आहे. हा पहिला टप्पा असून, लवकरच दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात येणार आहे. गेली अनेक दिवस पुणेकरांना स्मार्ट सिटीच्या गोंडस स्वप्नात रंगवले जात आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प कधी होणार, हा प्रश्न सामान्य पुणेकरांच्या मनात डोकावतो आहे.नागरिकांनी रस्त्यावर कचरा फेकू नये यासाठी स्मार्ट डस्टबिन प्रभागात बसविण्यात आले आहेत. या कचरापेटीला सेन्सर बसविण्यात आला असून, ती भरली की लगेच त्याची माहिती संबंधितांना मिळेल, त्यानंतर ई-रिक्षाद्वारे हा कचरा उचलला जाणार आहे. प्रभागात ४ ठिकाणी हे डस्टबिन उभारण्यात आले आहेत. नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी सिटीजन पोर्टल, मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याद्वारे अलर्ट्स, तातडीच्या सेवा, तक्रार नोंदविण्याची सुविधा मिळणार आहे. या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. (प्रतिनिधी)