शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ची पालिकेवर मनमानी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 06:25 IST

स्वायत्त म्हणून स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची महापालिकेवर मनमानी सुरूच आहे

पुणे : स्वायत्त म्हणून स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची महापालिकेवर मनमानी सुरूच आहे. सुरुवातीला सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानासमोर मंडईसाठी बांधण्यात आलेली इमारत कार्यालयासाठी म्हणून विनापरवाना ताब्यात घेण्यात आली. आता शहरात लावलेले भले मोठे एल.ई.डी. स्क्रिनही विनापरवाना लावण्यात आल्याचे उघड झाल्यानंतरही त्यासाठी कंपनीने परवानगी घेण्याची प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नाही.महापालिकेची एखादी जागा कोणाला वापरासाठी म्हणून द्यायची असेल, तर ती भाडेतत्त्वावर दिली जाते. त्यासाठी जागेच्या क्षेत्रफळाचा त्याठिकाणाच्या बाजारमूल्यानुसार (रेडीरेकनर) दर निश्चित केला जातो. त्यानंतर लिलावाद्वारे ती जागा ज्याची जास्त बोली असेल, त्यांना भाडेतत्त्वावर दिली जाते. महापालिकेच्या मालकीच्या एखाद्या साध्या दुकानासाठीही ही प्रक्रिया राबवली जात असताना महापालिकेची एक संपूर्ण इमारतच स्मार्ट सिटी कंपनीने विनापरवाना ताब्यात घेतली आहे.सिंहगड रस्त्यावर पु. ल. देशपांडे उद्यानासमोर असलेली ही इमारत मंडईसाठी आरक्षित असलेल्या जागेवर मंडई म्हणूनच बांधण्यात आली आहे. मंडई वापर न करता ही इमारत अनेक महिने पडून होती. त्यानंतर तिथे महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. आता तेही बंद करून संपूर्ण इमारतीत दोन्ही मजल्यांवर स्मार्ट सिटी कंपनीचे माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कंपनीने महापालिकेला दरमहा वापराचे शुल्क देणे आवश्यक आहे; मात्र तशी कोणतीही प्रक्रिया यासाठी राबवण्यात आलेली नाही.फॅब्रिकेशनचा चौथरा, त्यावर मोठा लोखंडी खांब व त्याच्या टोकावर मोठा आडवा पडदा, असे एकूण १६० खांब शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर असलेल्या पदपथांवर बांधण्यात आलेले आहेत. त्यापैकी एकाही खांबाला महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेतही काँग्रेसच्या अविनाश बागवे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी विनापरवाना बांधलेले हे खांब काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले होते; मात्र त्याला आता बरेच आठवडे होऊन गेले तरीही ही कारवाई करण्यातआलेली नाही.उलट आणखी काही चौकांमध्ये असे खांब उभे करण्यात येणार आहेत. त्यावर सामाजिक संदेश, जनहिताची आवश्यक माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरीही त्याचा व्यावसायिक वापर होणारच नाही, असे स्पष्ट करण्यात आलेले नाही.