शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी प्रस्तावानंतरचे कवित्व सुरूच

By admin | Updated: December 29, 2015 03:17 IST

स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार झाला, तो थेट दिल्लीला सादरही करण्यात आला, आता प्रतीक्षा आहे ती स्पर्धेच्या निकालात पुणे शहर कुुठे असेल त्याची; मात्र इतके झाल्यानंतरही संपूर्ण शहरात

पुणे : स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार झाला, तो थेट दिल्लीला सादरही करण्यात आला, आता प्रतीक्षा आहे ती स्पर्धेच्या निकालात पुणे शहर कुुठे असेल त्याची; मात्र इतके झाल्यानंतरही संपूर्ण शहरात वादळ उठवलेल्या या योजनेचे कवित्व अद्याप संपायला तयार नाही. सल्लागार कंपनी म्हणून नियुक्त केलेल्या मेकॅन्झीचा अहवाल पालिका प्रशासनाने गुप्तच ठेवला असल्याची तक्रार करण्यात येत आहे.तब्बल अडीच कोटी रुपये देऊन या कंपनीची स्थायी समितीने स्मार्ट सिटी योजनेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. आयुक्त कुणाल कुमार स्वत: त्यासाठी आग्रही होते. एरवी स्थायी समितीच्या सभांना कधीही हजेरी न लावणारे कुणाल कुमार हा विषय स्थायीसमोर आला त्यावेळी आवर्जून उपस्थित होते. एकूण ३ कंपन्यांची निविदा होती, त्यात मेकॅन्झी कंपनीची निविदा सर्वाधिक म्हणजे २ कोटी ५० लाख रुपये किमतीची होती. कमी रकमेच्या निविदा डावलून आयुक्तांच्या आग्रहामुळे स्थायी समितीने मेकॅन्झीला काम मंजूर केले. त्यावरूनही अनेक वाद झाले. पालिकेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आग्रहामुळेच हे काम संबंधित कंपनीला देण्यात आले असा आरोपही त्या वेळी झाला. पुणे बचाव आघाडीने स्थायीच्या या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही जाहीर केले होते. आता या कंपनीने प्रस्ताव तयार केला म्हणजे नक्की काय केले याबाबत स्वयंसेवी संस्थांकडून विचारणा होत आहे. सर्वसाधारण सभेने स्मार्ट सिटी योजना मंजूर करण्यासच अप्रत्यक्षपणे विरोध केल्यामुळे त्यावर बरीच चर्चा झाली. त्यामुळे आयुक्तांनी स्मार्ट सिटीसंबंधातील सर्व गोष्टी पालिकेच्या संकेतस्थळावर टाकणार असल्याचे जाहीर केले. आता काही गोष्टी त्यावर देण्यात आल्या असल्या तरी मेकॅन्झी कंपनीच्या अहवालाचा मात्र त्यात समावेश नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वयंसेवी संस्थांनी पुन्हा आयुक्त कुणाल कुमार यांच्यावर टीकेचे हत्यार उचलले आहे. सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी तर आयुक्तांना लेखी पत्रच दिले आहे.योजनेत सल्लागार कंपनी नियुक्त करण्यासाठी जाहीर करण्यात आलेली निविदा, मेकॅन्झी कंपनीला दिलेला कार्यारंभ आदेश, कंपनीबरोबर झालेल्या कराराचा तपशील व त्यांनी तयार केलेल्या प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती संकेतस्थळावर जाहीर करावी अशी मागणी कुभार यांनी केली आहे. अन्य काही संस्थांनीही अशीच मागणी केली आहे. (प्रतिनिधी)२० कंपन्यांबरोबर करार : अहवालासाठी अडीच कोटी खर्चस्मार्ट सिटीसाठी विविध कंपन्यांबरोबर आयुक्तांनी केलेल्या सामंजस्य करारावरूनही बरेच वादळ उठले. एकूण २० कंपन्यांबरोबर करार झाले असताना काही कंपन्यांबरोबर झालेल्या कराराचा मसुदा जाहीरच करण्यात आलेला नाही, तो का दडवून ठेवण्यात आला आहे, असा प्रश्न स्वयंसेवी संस्था विचारत आहेत.आयुक्तांनी स्मार्ट सिटीसंबंधातील सर्व काही पालिकेच्या संकेतस्थळावर टाकणार असल्याचे जाहीर केले. आता काही गोष्टी त्यावर देण्यात आल्या असल्या तरी मेकॅन्झीच्या अहवालाचा मात्र त्यात समावेश नाही. त्यामुळे संतप्त स्वयंसेवी संस्थांनी पुन्हा आयुक्तांवर टीकेचे हत्यार उपसले आहे.