शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ला वादळानंतर मंजुरी

By admin | Updated: December 15, 2015 04:16 IST

शहराच्या स्मार्ट सिटी आराखड्याला अखेरच्या क्षणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेने पाठिंबा जाहीर केल्याने मुख्य सभेमध्ये १३ तासांच्या वादळी चर्चेनंतर त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली.

पुणे : शहराच्या स्मार्ट सिटी आराखड्याला अखेरच्या क्षणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेने पाठिंबा जाहीर केल्याने मुख्य सभेमध्ये १३ तासांच्या वादळी चर्चेनंतर त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्याच वेळी स्पेशल पर्पज व्हेईकलमुळे (एसपीव्ही) महापालिकेची स्वायत्तता धोक्यात येऊ नये याकरिता त्याचे अधिकार कमी करणाऱ्या ५ उपसूचनांना मुख्य सभेने मंजुरी दिली.राज्यशासानाने दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी स्मार्ट आराखड्याचे भवितव्य ठरविण्यासाठी मुख्य सभा झाली. महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी सभा होत असल्याने स्मार्ट आराखड्यावर काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. नगरसेवकांचा तीव्र विरोध असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी स्मार्ट सिटी आराखड्याला पाठिंबा देण्याच्या सूचना दिल्याने आराखडा मंजुरीचा मार्ग सुकर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट व आयुक्त कुणाल कुमार यांनी आराखडा मंजुरीसाठी लावलेली फिल्डिंग अखेर यशस्वी ठरली.एसपीव्हीच्या तरतुदींना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. स्मार्ट सिटी आराखड्यावरून शहरामध्ये गेल्या ५ ते ६ दिवसांपासून रणकदंन सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे यांच्याकडून या आराखड्याला तीव्र विरोध केला जात असल्याने याला मंजुरी मिळणार की नाही, याबाबत साशंकता होती. मुख्य सभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसने आराखडयातील काही तरतुदींना विरोध कायम ठेऊन त्याला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. दुपारच्या भोजनानंतर सभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर बाबू वागस्कर यांनी स्मार्ट सिटीला पाठिंबा देत असल्याचे घोषित करताच सभागृहातील वातावरण बदलले. अन् सर्व अनिश्चिता संपून स्मार्ट सिटी आराखडा दोन तृतीयांश बहुमताने मंजूर होणार हे स्पष्ट झाले.स्मार्ट सिटी आराखड्यातील एसपीव्हीच्या वादग्रस्त तरतुदी, औंध-बाणेर या विकसित भागाचाच पुन्हा विकास, आयुक्तांनी विश्वासात न घेणे या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेच्या सभासदांकडून याला तीव्र विरोध करण्यात येत होता. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी याबाबत बैठक घेऊन नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. मुख्यसभा सुरू होईपर्यंत स्मार्ट सिटी राजकीय पक्षांकडून स्मार्ट सिटी आराखडयाबाबत शह-काटशहाचे राजकारण सुरू होते.