शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सुशोभीकरणाला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:16 IST

स्मार्ट सिटीच्या पाऊलखुणा म्हणून जंगली महाराज रस्त्यावरील सुशोभीकरण योजनेची गाजावाजा करून सुरुवात झाली खरी. मात्र सायंकाळच्या वेळी या ठिकाणाचा पाणीपुरी व तत्सम विक्रेते

पुणे : स्मार्ट सिटीच्या पाऊलखुणा म्हणून जंगली महाराज रस्त्यावरील सुशोभीकरण योजनेची गाजावाजा करून सुरुवात झाली खरी. मात्र सायंकाळच्या वेळी या ठिकाणाचा पाणीपुरी व तत्सम विक्रेते आणि पथारीवाल्यांनाही आसरा वाटू लागला आहे. इतस्तत: पडलेला कचरा, पार्क केलेली दुचाकी वाहने असे दृश्य या सुशोभीकरणात सध्या दिसत असून मेट्रो रेल्वेचे स्थानकाचा सांगावा देणारा फलक झळकू लागल्याने सुशोभीकरणाची लवकरच अवकळा होण्याची चिन्हे आहेत.सुशोभीकरणासाठी जंगली महाराज रस्त्याचा दुतर्फा भाग व्यापल्याने महानगरपालिकेने या रस्त्याचा ‘बोळ’ झाल्याची टीका मध्यंतरी झाली होती. सकाळी फिरण्याचा व्यायाम करण्यासाठी येणाºया स्थानिक नागरिकांसाठी सुशोभीकरणाचा परिसर रम्य असल्याचे बोलले जाते. तथापि, खाद्यपदार्थ, पुस्तके आणि तत्सम वस्तू विकणाºयांची मोठी लगबग या रस्त्यावर असते.सायंकाळ होऊ लागताच पाणीपुरी विक्रेते, फुगे विक्रेते, शेंगदाणे, फुटाणे तसेच चहा विक्रेते यांनी या भागात ठिय्या मारणे सुरू केले आहे. विक्रेत्यांकडून घेतलेल्या पदार्थांच्या उष्ट्या डीश,प्लॅस्टिकच्या पिशव्या, पालापाचोळा यांचा कचरा सुशोभीतकेलेल्या भागामध्ये इतस्तत: पडलेला दिसून येतो.मेट्रो रेल्वेचे स्थानक संभाजी उद्यानाच्या परिसरातच असणार असून त्याची माहिती देणारा फलक पालिकेने नुकताच संभाजी उद्यानालगत, सुशोभीत पदपथाजवळच्या सायकल ट्रॅकजवळ लावला आहे. या स्थानकाच्या कामासाठी सुशोभीत पदपथ उखडावा लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पालिकेने या पदपथाच्या स्वच्छतेकडे, विक्रेत्यांच्या व वाहनांच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केल्याने मूळ हेतू बाजुला पडला असून आगामी काळात सुशोभीकरणाच्या सुस्थितीबद्दल शंका उपस्थितहोत आहेत.