शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डांबरीकरणाचा सपाटा

By admin | Updated: February 15, 2016 01:31 IST

अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाचा धडाका सुरू झाला आहे. चऱ्होली व परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असून

पिंपरी : अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाचा धडाका सुरू झाला आहे. चऱ्होली व परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असून, यासाठी सव्वा दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. डांबरीकरणाचे अनेक विषय स्थायीसमोर मंजुरीसाठी आले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डांबरीकरणाचा सपाटा तर लावला नसेल ना, अशी चर्चा शहरात आहे. वडमुखवाडीमधील माऊलीनगर, काटेवस्ती व चोविसावाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. यासाठी १९ लाख ६६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. एका ठेकेदाराने ३३ टक्के कमी दराची निविदा सादर करून २८ लाख रुपयांत काम करण्याची तयारी दर्शविली आहे. यासह चऱ्होलीतील बुर्डेवाडी व इतर ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी १९ लाख ६२ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. ठेकेदाराने ३३.३३ टक्के कमी दराची निविदा सादर केल्याने या कामासाठी २८ लाख खर्च होणार आहे. यासह कोतवाल, काळजेवाडी, पठारेमळयातील रस्त्यांचेही डांबरीकरण होणार आहे. त्यासाठी २९ लाख ४३ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. तसेच वडमुखवाडीमधील माऊलीनगर, साईनगरी, लक्ष्मीनारायणनगर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार असून, त्यासाठी २९ लाख ४२ हजारांचा खर्च केला जाणार आहे. चक्रपाणी वसाहतमधील विश्वकर्मा कॉलनी, गणेशनगर व इतर ठिकाणच्या डांबरीकरण केले जाणार आहे. या कामासाठी ५२ लाख ५२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. ठेकेदाराने ३३.३३ टक्के कमी दराची निविदा सादर केल्याने या कामासाठी ३६ लाख ७६ हजार रुपये खर्च होणार आहे. लांडगे वस्ती, महादेवनगर, हनुमाननगरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असून, यासाठी ४२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रभाग ६० मधील मुळा नदीकडील डी. पी. रस्ता विकसित केला जाणार आहे. (प्रतिनिधी)