शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

गुळाच्या दरामध्ये मोठी घसरण, प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 01:03 IST

पुणे : राज्यात गुळाची गु-हाळे पेटली असून, गुळाचा हंगाम जोमात सुरू आहे. यामुळे मार्केट यार्डात नवीन गुळाची आवक चांगलीच वाढली आहे.

पुणे : राज्यात गुळाची गु-हाळे पेटली असून, गुळाचा हंगाम जोमात सुरू आहे. यामुळे मार्केट यार्डात नवीन गुळाची आवक चांगलीच वाढली आहे. सध्या मार्केट यार्ड येथील बाजारात दररोज २०० ते ३०० बॉक्स सेंद्रिय गूळ व ५ ते ६ हजार डाग दाखल होतो. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने मागील तीन वर्षांच्या तुलनेत गुळाच्या दरात एक हजार रुपयांची घट झाली असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.आॅक्टोबरमध्ये राज्यात सर्वत्र झालेल परतीच्या पावसामुळे ऊसतोड काही प्रमाणात थांबली होती. यामुळे गुळाची गुºहाळेदेखील बंद पडली होती; परंतु त्याचा परिणाम गुळाच्या किमतीवर होऊन दरामध्ये मोठी वाढ झाली. त्यात मराठवाड्यातील दुष्काळाचादेखील दरवाढीवर परिणाम झाला. यामुळे येथील गुळाच्या उत्पादनामध्ये १० ते १५ टक्क्यांनी घट झाली. तर गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी भागांतून राज्यातील गुळाला मागणी वाढल्याने काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. याचा एकत्रित परिणाम होऊन राज्यात मोठी गूळ दरवाढ झाली. दरम्यान, मॉन्सून माघारी फिरल्यानंतर राज्यातील कराड, कोल्हापूर, सांगली, बारामती, अकलूज, नीरा व केडगाव या पेठांमधून मोठ्या प्रमाणात गूळ उत्पादनाला सुरुवात झाल्याने बाजारात आवक वाढली आहे. गूळ उत्पादनातून पैसे लगेच मिळत असल्याने बहुतांश शेतकºयांनी गुळाचे उत्पादन घेण्यास प्राधान्य दिले आहे. बाजारात ५० ग्रॅमपासून १० किलोंपर्यंत गूळ उपलब्ध असून, त्याला घरगुती ग्राहक, मिठाईवाले तसेच परराज्यांतील व्यापाºयांकडून मागणी होत आहे. यामध्ये, रसायनविरहित असलेल्या सेंद्रिय गूळ तसेच गूळ पावडरला मागणी वाढत आहे.>गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत गुळाच्या दरातील ही सर्वाधिक घसरण आहे. संक्रांतीमुळे बाजारात गुळाला मोठी मागणी आहे. मात्र, आवक जास्त असल्याने दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. सध्याचे गुळाचे घटलेले दर येते काही दिवस कायम राहतील. संक्रांतीनंतर सोलापूर आणि लातूर परिसरातून गुळाची आवक सुरू होईल. मात्र, त्यानंतर गुळाचे दर उतरण्याची शक्यता कमी आहे. - शशांक हापसे, गूळ व्यापारी>गुळाचा प्रकार सध्याचे दर आॅक्टोबर महिन्यातील(प्रतिक्विंटल) दर (प्रतिक्विंटल)पिवळा माल २९००-३०५० ४२००-४५००मध्यम माल २८००-२९५० ३८००-४१००लाल माल २६००-२७०० ३६००-३७५०एक्स्ट्रॉ ३२००-३४०० ३९००-४१००बॉक्स पॅकिंग ३०००-३४०० ४०००-४५००