शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

डल्ला मारण्याआधी व्हा, सावध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 01:02 IST

गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सोनसाखळी चोरी, चाकूचा धाक दाखवून लुटणे या चोरीच्या घटनांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे

पिंपरी : गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सोनसाखळी चोरी, चाकूचा धाक दाखवून लुटणे या चोरीच्या घटनांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तर नागरिकांना घर बंद करून बाहेरगावी जाणेही धोकादायक वाटू लागले आहे. कारण, बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर असून, गेल्या तीन महिन्यांत दिवसा व रात्री मिळून ८४ घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये फक्त १२ घटनाच उघडकीस आल्या असून, चोरटे अद्यापही मोकाटच आहेत.सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्या असून, बहुतांश कुटुंबे बाहेरगावी फिरायला-नातेवाइकांकडे जाण्याचे नियोजन करीत आहे. याचा फायदा चोरटे घेत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून तर घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घर दिसल्यावर चोरटे लागलीच कडी-कोयंडा उचकटून लाखोंचा मुद्देमाल लंपास करीत आहेत. परिमंडल तीनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:शृंगी, हिंजवडी, सांगवी, वाकड या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांत ८४ घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये दिवसा ३२ घरफोडीच्या घटना घडल्या असून, यात सर्वाधिक घरफोड्या सांगवी आणि वाकडमध्ये ६ ठिकाणी, तर भोसरीत ५ ठिकाणी घरफोड्या झाल्या. तसेच इतर पोलीस ठाण्यांमध्येही दिवसा घरफोडीच्या घटनांची नोंद असून, ३२ घरफोडीच्या घटनांपैकी फक्त दोनच घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ५२ ठिकाणी रात्रीच्या घरफोड्या झाल्या असून, यामध्ये सर्वाधिक १४ घरफोड्या निगडीत झाल्या.या १४ पैकी दोनच घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, रात्रीच्या एकूण ५२ घरफोडीच्या घटनांपैकी फक्त १० घटनांचा छडा पोलिसांनी लावला आहे. (प्रतिनिधी)नागरिकांचीही उदासीनतागेल्या तीन महिन्यांपूर्वी पिंपरीतील अजमेरा कॉलनी, तळवडे, निगडी या ठिकाणी दिवसा घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर तेथील सोसायट्यांमधील नागरिक किती जागरूक झाले. याची पाहणी करण्यासाठी ‘लोकमत टीम’ने त्या ठिकाणी दिवसा स्टिंग आॅपरेशन केले होते. ज्या सोसायटीत घरफोडी झाली होती त्या ठिकाणी प्रतिनिधी हातात लोखंडी हातोडी घेऊन फिरले. एका ठिकाणी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भासवले. सोसायटीत फिरताना परिसरातील नागरिक फक्त बघत होते. मात्र, कोणीही हटकले नाही आणि विचारपूसही केली नाही. यावरून सुरक्षितेबद्दल नागरिकांची उदासीनता दिसून आली.