शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महिला कैद्यांना कुशल रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:17 IST

येरवडा मध्यवर्ती कारागृहासमोरील महिला कारागृहात दुचाकी वाहनांच्या चाव्यांचा म्हणजेच ‘इलेक्ट्रॉनिक की सेट’चा प्रकल्प सुरू होणार आहे.

येरवडा : येरवडा मध्यवर्ती कारागृहासमोरील महिला कारागृहात दुचाकी वाहनांच्या चाव्यांचा म्हणजेच ‘इलेक्ट्रॉनिक की सेट’चा प्रकल्प सुरू होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १५ महिला कैद्यांना प्रशिक्षण देऊन कुशल प्रशिक्षित करण्याबरोबरच त्यांना रोजगारप्राप्तीही होणार आहे. येरवडा कारागृहात कैैद्यांसाठी विविध प्रकारचे कौशल्य देण्यात येत आहे. त्यातीलच हा एक वेगळा प्रकल्प असणार आहे.दुचाकी वाहनांना लागणाऱ्या चाव्यांचे ‘सेट’ तयार करण्याचे काम ‘मिंडा स्पार्क प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी करते. या कंपनीने महिला कारागृहात हे सेट बनवण्याचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाला दिला होता. या प्रस्तावास कारागृह प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर प्रकल्प उभारणीच्या जागेलाही मान्यता देण्यात आली. या कंपनीने काही महिन्यांपूर्वी एका कंपनीच्या चारचाकी मोटारीला लागणाºया वायरिंगचा प्रकल्प येरवडा मध्यवर्ती कारागृहात उभारला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्याने कंपनी व्यवस्थापनाने महिला कारागृहात दुचाकीच्या इलेक्ट्रॉनिक चावी सेट बनवण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता.येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार म्हणाले की, सुरुवातीला कारागृहातील १५ महिला कैद्यांना या प्रकल्पात प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर या प्रशिक्षित महिलांकडून कंपनीच्या अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक चावी सेट तयार करून घेतले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर महिला कैद्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. यातील किमान ३५ महिलांना कंपनीच्या प्रकल्पात काम दिले जाणार आहे.या कामाच्या मोबदल्यात कंपनीकडून कारागृहाला प्रतिमहिला अडीचशे रुपये दररोजप्रमाणे पैसे मिळणार आहेत. यातील प्रत्येक महिला कैद्याला रोजगार म्हणून ६१ रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार येतील. त्यामुळे महिला कैद्यांना हक्काचा रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.>सुरुवातीला कारागृहातील १५ महिला कैद्यांना या प्रकल्पात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर या महिलांकडून इलेक्ट्रॉनिक चावी सेट तयार करून घेण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर महिला कैद्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.- यू. टी. पवार, अधीक्षक,येरवडा कारागृह