शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मावळात सहा महिन्यांत सहावा बळी

By admin | Updated: December 9, 2015 00:16 IST

संत-महंतांच्या पावन स्पर्शाने पुनित मावळच्या भूमीत मागील काही काळापासून उदयास आलेली राजकीय महत्त्वाकांक्षा व आर्थिक सुबत्ता यांमुळे राजकीय क्षेत्रातील खुनाच्या

लोणावळा : संत-महंतांच्या पावन स्पर्शाने पुनित मावळच्या भूमीत मागील काही काळापासून उदयास आलेली राजकीय महत्त्वाकांक्षा व आर्थिक सुबत्ता यांमुळे राजकीय क्षेत्रातील खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे़ गेल्या सहा महिन्यांत सहा खून झाले. त्यातील चार राजकीय कारणांवरून झाले आहेत.छत्रपती शिवरायांच्या बारा मावळांपैकी प्रमुख असलेल्या मावळ तालुक्याला संतांच्या वास्तव्याचा मोठा इतिहास आहे़ मुंबई व पुणे या मोठ्या शहरांच्या मध्यावर वसलेला तालुका असा नावलौकिक असलेल्या मावळात काही काळापासून खुनाच्या घटनांमुळे गालबोट लागले आहे़ युवा पिढीमध्ये वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा, जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमधून आलेली आर्थिक सुबत्ता, खालावलेली वैचारिकता व संवादाकडून विसंवादाकडे जाणारी पाळेमुळे यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे़ राजकारणात मोठे पद मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणे इथपर्यंत सर्व ठीक आहे़ मात्र त्यामधून एखाद्या व्यक्तीला संपवून टाकणे हे कितपत योग्य आहे़ पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्ध चालतात. मात्र, मावळच्या भूमीत आजपर्यंत कोणीही असा प्रयत्न केला नव्हता. त्याचे महत्त्वाचे कारण राजकीय वाद, पक्ष काही असले, तरी मावळासाठी सर्वजण एकदिलाने व एकविचाराने काम करीत होते़ मात्र तीच वैचारिकता कमी होऊ लागली असल्याचे अलीकडील घटनांवरून दिसू लागले आहे़ जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमधून आलेली सुबत्ता व चंगळवादी होत असलेली युवा पिढी यांना हाताशी धरत मागील काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एक गँगने मावळात पाय रोवण्यास सुरुवात केली होती. मात्र पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे तो डाव उधळण्यात काही प्रमाणात यश आले़ असे असले, तरी संवादाकडून विसंवादाकडे सुरू असलेली वाटचाल यामुळे मावळात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ एखाद्या घटनेला पार्श्वभूमी काही जरी असली, तरी जय व पराजय पचविण्यासाठीची खिलाडू वृत्ती कमी झाली असल्याचे यावरून अधोरेखित होत आहे़ मावळ हा मावळ्यांचा, जिगरबाजांचा, कर्तृत्ववान व्यक्तींचा, संतांचा भाग आहे. या ठिकाणी खून व खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना शोभनीय नाहीत़ या घटना वेळीच रोखणे गरजेचे आहे़ निवडणुका व आर्थिक सुबत्ता येत-जात असतात. मात्र, या गोष्टीकडे पाहण्याची संकुचित दृष्टी बदलणे गरजेचे आहे़ वादातून वाद घालण्याऐवजी संवादातून समतोल साधणे गरजेचे आहे़ मावळात मागील सहा महिन्यात सहा खून झाले आहेत़ यापैकी चार राजकीय वादांमधून, तर दोन वैयक्तिक कारणांवरून झाले आहेत़ अशा घटना वेळीच रोखणे गरजेचे आहे़ राजकीय वादातून खुनाच्या घटना, तसेच भांडणांचे प्रकार वाढले आहेत.(वार्ताहर)