शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

सहा वर्षांपासून रखडला उड्डाणपूल

By admin | Updated: February 11, 2016 03:11 IST

नदी, महामार्ग आणि रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाच्या प्रकल्प उभारणीचे काम २००९ला सुरू झाले. आॅक्टोबर २०१३ला प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असताना

- संजय माने, पिंपरीनदी, महामार्ग आणि रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाच्या प्रकल्प उभारणीचे काम २००९ला सुरू झाले. आॅक्टोबर २०१३ला प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असताना २०१६ वर्ष आले, तरी प्रकल्प अर्धवट आहे. तब्बल सात वर्षे प्रकल्पाचे काम सुरू असून, जुलै २०१६ला प्रकल्प पूर्ण होईल, असे आश्वासन महापालिकेचे अधिकारी देत आहेत. अवघ्या १.६ किलोमीटर लांबीच्या ९९ कोटींच्या खर्चाच्या या उड्डाणपूल प्रकल्पावर आत्तापर्यंत ६५ कोटींचा खर्च झाला आहे. काळेवाडी फाटा-देहू-आळंदी बीआरटी रस्त्याला जोडणारा एम्पायर इस्टेटचा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. एम्पायर इस्टेट या गृहप्रकल्पाच्या जवळून उड्डाणपूल जाणार असल्याने रहिवाशांनी विरोध केला होता. वाहनांची वर्दळ वाढल्यास ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार, असे रहिवाशांचे म्हणणे होते. ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी पॉलिकार्बोनेटचे सीट लावून उपाययोजना करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी अधिकचे १५ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी महापालिकेने दाखवली. त्यानंतर रहिवाशांचा विरोध मावळला. प्रकल्पाचे काम सुरू झाले. गॅमन इंडिया या कंत्राटदारास ३० महिन्यांची मुदत देण्यात आली. काम अत्यंत संथ गतीने सुरू झाले. आॅक्टोबर २०१३मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना केवळ ३० टक्के काम झाले. त्यामुळे शहरातील नागरिक, तसेच नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला. काही पदाधिकारी, नगरसेवकांनी तर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. सुरुवातीपासून प्रकल्पाला विरोध होत असताना, अन्य अडचणी येऊ लागल्या. काम रेंगाळल्याने कंत्राटदारापुढे आर्थिक अडचणही निर्माण झाली. दरम्यानच्या काळात दुसरा कंत्राटदार नेमून काम करता येईल का, असा विचारही पुढे आला. दुसरा कंत्राटदार नेमला जाऊ शकेल, हे लक्षात येताच कंत्राटदाराने लवादाकडे धाव घेतली. लवादात गेल्यानंतर कामाची गती आणखी मंदावली. दुसरा कंत्राटदार नेमल्यास प्रकल्पाच्या कामात आणखी कायदेशीर अडचणी निर्माण होतील, हे लक्षात घेऊन महापालिकेने दुसरा कंत्राटदार नेमण्याच्या हालचाली बंद केल्या. लवादासाठी नेमण्यात आलेल्या प्रशासकांच्या माध्यमातून महापालिका आणि प्रकल्पाचे काम करणारे कंत्राटदार यांच्यात समन्वयाचा तोडगा काढण्यात आला. तोपर्यंत २०१४ वर्ष आले होते. त्यानंतर रखडलेले काम पुन्हा सुरू झाले. अडथळ्यांची शर्यत : उदासीनता कारणीभूत एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे रेंगाळलेले काम पूर्ण झाले. कामाला गती आली असताना काही नगरसेवक कंत्राटदाराकडे पैैशांची मागणी करत असल्याच्या प्रकाराची चर्चा सुरू झाली. कंत्राटदाराने कोठेही कोणाच्या विरोधात तक्रार दिली नव्हती. परंतु, ठेकेदाराची अडवणूक करणारे नगरसेवक कोण, याबद्दलची उत्सुकता वाढली होती. असेच प्रकार सुरू राहिल्यास सुरू झालेल्या प्रकल्पाच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, या प्रकारावर पडदा पडला. काम विनाव्यत्यय सुरू झाले आहे. ७० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित ३० टक्के काम पूर्णत्वास जाण्यास आणखी सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे.