शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाला तयार होतोय कोरोनाचा सहा हजार किलो कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:10 IST

पुणे : कोरोना काळात जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढले असून, दिवसाला सरासरी सहा हजार किलोपेक्षा अधिक कोरोनाचा कचरा निर्माण होत ...

पुणे : कोरोना काळात जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढले असून, दिवसाला सरासरी सहा हजार किलोपेक्षा अधिक कोरोनाचा कचरा निर्माण होत आहे. तर, अन्य वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण आठ हजार किलोपेक्षा अधिक आहे. हा जैविक कचरा इनसिनिरेटरमध्ये जाळला जात आहे. मास्कचा वापर वाढल्याने हा कचराही मोठ्या प्रमाणावर जमा होत असून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जात आहे.

पालिकेने एका कंपनीसोबत करार केलेला असून, या कंपनीच्या इनसिनिरेटरमध्ये हा कचरा जाळून नष्ट केला जात आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. शहरात सद्यस्थितीत जवळपास ५३ हजार रुग्ण गृहविलगीकरणात आणि प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांवरील उपचारांमधून निर्माण होणा-या कच-यासह पीपीई किट्स, जेवणाची ताटे व अन्य साहित्य असा सहा ते सात टन कचरा दिवसाकाठी निर्माण होत आहे.

----

डॉ. नायडू रुग्णालयाजवळील कैलास स्मशानभूमीजवळ असलेल्या या कंपनीवर सध्या वाढलेल्या जैविक कच-यामुळे ताण वाढला आहे. आवश्यकता भासल्यास तळोजा कोरोनाचा कचरा पाठविला जातो. हा कचरा पाठविण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतली आहे. शहरातील प्रकल्पाची क्षमता चार हजार किलो कचऱ्याची आहे. त्याची पूर्णत: सुरक्षितपणे आणि वैज्ञानिकदृष्ट्या विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

======

वापरलेल्या मास्कचे काय केले जाते?

रुग्णालयांमध्ये वापरलेले मास्क कोविड कचऱ्यासोबतच गोळा केले जातात. यासोबतच गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांचा कचरा उचलण्याची पालिकेने व्यवस्था लावलेली आहे. हा कचरा वेगळा ठेवला जातो. हा कचरा इनसिनिरेटरमध्ये जाळला जातो.

-------

शहरात रोज निघणारा कचरा - २१०० मेट्रिक टन

ओला कचरा - ९०० मेट्रिक टन

सुका कचरा - १२०० मेट्रिक टॅन

रूग्णालयांमधून निर्माण होणारा कचरा - १४ मेट्रिक टन

------

बंदिस्त वाहनांमधून वाहतूक

रुग्णालयांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण १४ टन आहे. यामध्ये कोविडचा कचरा सहा टन तर कोविड व्यतिरिक्त अन्य वैद्यकीय कचरा आठ टनांपर्यंत जमा होतो. या कचऱ्याची बंदिस्त वाहनांमधून वाहतूक केली जाते. हा कचरा रस्त्यावर वा अन्यत्र पडू नये याची खबरदारी घेतली जाते. हा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने जाळला जातो.

-------

शहरात दिवसाला सहा ते सात टन कोविड कचरा जमा होत असून अन्य वैद्यकीय कचराही आठ टनांपर्यंत निर्माण होत आहे. हा कचरा इनसिनीरेटरमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने जाळला जातो. दिवसाला चार हजार टन कचरा नष्ट केला जात आहे.

- डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका