शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सहा हजार कोटींचे वीज बिल थकविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 04:56 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रताप

विशाल शिर्के पिंपरी-चिंचवड : सामान्य ग्राहकच नव्हे, तर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी एप्रिल २०२० पासून एकदाही वीज बिल भरले नाही. एप्रिल महिन्यापासून एकदाही बिल न भरलेल्यांच्या एकूण थकबाकीपैकी जवळपास साठ टक्के थकबाकी सार्वजनिक संस्थांकडे आहे.

कोरोनाच्या (कोविड १९) पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाली. त्यामुळे महापालिका आणि नगरपालिकांच्या करामध्ये देखील मोठी घट झाली. परिणामी सामान्य ग्राहकांबरोबरच सार्वजनिक आस्थापनांना देखील महावितरणचे वीज बिल भरता आलेले नाही. ६ हजार ५०७ कोटी रुपये सार्वजनिक सेवा आणि उपक्रमातील  १ लाख ५८ हजार ग्राहकांकडे आहेत. त्यात पथदीप, सार्वजनिक पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सेवा घेणाऱ्या ग्राहकांचा समावेश  आहे. पाणी पुरवठा आणि पथदीप  यांची जबाबदारी सार्वजनिक संस्थांची असते. त्याच जोडीला शासकीय निवासस्थान, शासकीय कार्यालये आणि इतर सार्वजनिक सेवांची थकबाकी देखील मोठ्या प्रमाणावर आहे. स्थानिक शासकीय कार्यालयांना भेटी देऊन पाणी पुरवठा, शासकीय निवास, पदपथ दिवे यांची वीज बिल थकबाकी भरण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

एप्रिल-ऑक्टोबर २०२० पर्यंत एकदाही बिल न भरलेले सार्वजनिक संस्था

    ग्राहक संख्या     थकबाकी  पथदीप         ७०,०२३     ५०९१.३  सार्वजनिक पाणी पुरवठा        ३८,५८६     १,३४७ सार्वजनिक सेवा         ५०,३४७     ६९.४  एकूण    १,५८,९५६     ६,५०७.७

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याelectricityवीज