शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्याची कामे केली एकाच दिवसात!

By admin | Updated: December 11, 2015 00:46 IST

महावितरणच्या त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत पिंपरी उपकेंद्र शाखेच्या अंतर्गत वेगवेगळी दुरुस्ती कामे, नवीन मीटरजोड आणि तांत्रिक बदल आदी कामे युद्धपातळीवर एका दिवसात पूर्ण करण्यात आली.

पिंपरी : महावितरणच्या त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत पिंपरी उपकेंद्र शाखेच्या अंतर्गत वेगवेगळी दुरुस्ती कामे, नवीन मीटरजोड आणि तांत्रिक बदल आदी कामे युद्धपातळीवर एका दिवसात पूर्ण करण्यात आली. सुमारे सहा महिने मुदतीतील ही कामे विक्रमी वेळेत केवळ एकाच दिवसात करण्यात आली. यासाठी २२ अभियंत्यांसह ३०० कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या मोहिमेमुळे या भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण घटणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. महावितरणतर्फे त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी विभागातील पिंपरीगाव उपकेंद्रात गुरुवारी ही मोहीम राबविण्यात आली. पिंपरीगाव, वाघेरेवस्ती, पिंपरी कॅम्प, शास्त्रीनगर, भाटनगर, बौद्धनगर, चापेकर चौक, लिंक रोड, फिनोलेक्स चौक, जिजामाता हॉस्पिटल, जयहिंद स्कूल, नाणेकर कॉम्प्लेक्स, मंडई या भागांत मोहीम राबविण्यात आली. मोठी बाजारपेठ आणि झोपडपट्ट्या असलेला हा भाग आहे. येथे एकूण २५ हजार ग्राहक आहेत. बौद्धनगर येथे ४८ नवे मीटर देण्यात आले. बिलासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यात आले. त्याचा लाभ ६ ग्राहकांना झाला. नादुरुस्त आणि जुने १२० मीटर बदलून देण्यात आले. जुने फीडर बदलून नवे बसविण्यात आले. रोहित्रच्या परिसरातील गवत आणि कचरा काढून साफसफाई केली गेली. फीडर पिलरचे निघालेले दरवाजे बसविण्यात आले. रोहित्रामध्ये आॅईल टाकण्यात आले. जुने आणि खराब केबल व तारा बदलून नव्याने टाकण्यात आल्या. तसेच, गंजलेले व खराब खांब बदलण्यात आले. अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या. २२ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीवर नवे स्विच बसविण्यात आले. जॅम्पचे बॉयडिंग केले गेले. एकमेकांना स्पर्श करू नये म्हणून तारांवर २२ ठिकाणी पेसर लावण्यात आले. (प्रतिनिधी)महावितरणच्या त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत ही मोहीम गुरुवारी राबविण्यात आली. गुरुवारी वीज खंडित असल्याने दिवसभर दुरुस्ती आणि जोडणी कामे करण्यात आली. येत्या सहा महिन्यांत होणारी ही सर्व कामे केवळ एका दिवसात वेगात केली गेली. पिंपरी विभागातील २२ उपकेंद्रांत टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविली जाणार आहे. यापुढील मोहीम १५ दिवसांनी ताथवडे येथे राबविण्यात येणार आहे.- धनंजय औंढेकर, कार्यकारी अभियंता