शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खड्डयांमुळे सहा दुचाकीस्वार जखमी

By admin | Updated: August 11, 2014 04:02 IST

या बाबीचे गांभीर्याने दखल घेऊन पेठ येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने दोन ते तीन फूट लांब रुंदीचे व एक फुटापेक्षा जास्त खोलीचे धोकादायक खड्डे मुरूम व माती आणून बुजविले.

पेठ : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेपवाईमुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) परिसरात अन्नपूर्णा ढाब्याच्या रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी मोठमोठ्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे पाच ते सहा दुचाकीस्वार जखमी झाले. या बाबीचे गांभीर्याने दखल घेऊन पेठ येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने दोन ते तीन फूट लांब रुंदीचे व एक फुटापेक्षा जास्त खोलीचे धोकादायक खड्डे मुरूम व माती आणून बुजविले.पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ परिसरातील रस्त्यावर गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहनचालकांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या रस्त्यावरून वाहन चालविणे मोठ्या जिकिरीचे काम होते. पेठनजीक अन्नपूर्णा ढाब्याच्या परिसरातील रस्त्यावर गेल्या वर्षी येथील पडलेल्या खड्ड्यात राजगुरुनगर येथील एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी होऊन त्याला स्वत:चे पाय गमवावे लागले होते. या परिसरात रस्त्यावर मध्यभागी, तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खूप मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या खड्ड्यांच्या जागेवर रात्रीच्या वेळी पाच ते सहा दुचाकीस्वार जखमी झाले आहे. या रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या संजय ढमाले यांनी सांगितले, की शुक्रवारी (दि. ०८) रात्री आठ ते दहाच्या दरम्यान पाच ते सहा दुचाकीस्वार अंदाज न आल्यामुळे खड्ड्यात पडले. या सर्वांना बाजूला घेऊन मदत केली. त्यामुळे पेठ ग्रामस्थांनी धोकादायक खड्डे बुजविण्याचा निश्चय केला. अर्जुन मोरडे यांनी आपल्या स्वत:च्या छोटा हाथी या वाहनामध्ये मुरूम व माती आणून खड्डे बुजविण्यासाठी ग्रामस्थ सुरेश धुमाळ, संजय ढमाले, बाळासाहेब ढमाले, जमादार तांबोळी, दिगंबर ढमाले, खंडू पवार, सुनील मोरडे यांच्या मदतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकामी पुढाकार घेतला. येणाऱ्या-जाणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनचालकांनी ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)