शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वडगावला सहा सशस्त्र दरोडेखोरांना अटक

By admin | Updated: November 10, 2014 22:50 IST

दरोडय़ाच्या तयारीत निघालेल्या 6 जणांच्या सशस्त्र टोळीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी जेरबंद केले.

वडगाव निंबाळकर : दरोडय़ाच्या तयारीत निघालेल्या 6 जणांच्या सशस्त्र टोळीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी जेरबंद केले. 
पोलिसांनी रविवार, दि. 9 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास ही कारवाई केली.  मोहन वामन पवार (वय 35,  रा. पाटस रोड, बारामती), नीलेश हनुमंत तांबे (वय 32, रा. गुणवडी, ता. बारामती), किशोर सतिश शिवरकर (वय 21), मनोज सिंग (वय 21, दोघे रा. सहयोग सोसायटी बारामती), विशाल प्रकाश मलगुंडे (वय 24), राहुल चंद्रकांत मलगुंडे (वय 25 दोघेही रा. मलगुंडेवस्ती जळोची, ता. बारामती) या सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमेश्वरनगर परिसरात संशयितरीत्या काही तरुण फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून साध्या वेशातील पोलिसांनी त्यांचे निरीक्षण केले. तेव्हा आरोपींकडे शस्त्र असल्याचे दिसले. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश ¨शदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल ओमासे, भगवान थोरवे, दत्तात्रय मोरे, धर्मवीर खांडे यांच्या पथकाने निरा-बारामती मार्गावर सापळा रचला.
सोमेश्वरनगरच्या बाजुने आरोपींची तवेरा गाडी (क्रमांक एमएच 23/ई 5225) ही वडगांव निंबाळकर ठाण्यासमोर आली असता या गाडीला वाहने आडवी लावून पोलिसांनी मोठय़ा शिताफीने आरोपींना पकडले.
त्यांच्या वाहनामध्ये तलवार, सुरा, लोखंडी गज, मिरची पावडर, नायलन दोरी, बॅटरी, काठी असे दरोडय़ा व चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य आढळुन आले. आरोपींना  7 दिवसांची कोठडी मागितली आहे. त्यामध्ये काही आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)