शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’पणात मध्यस्थांची चांदी

By admin | Updated: May 28, 2017 03:58 IST

डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या योजनेत उल्लेखनीय सहभाग दाखविण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये स्पर्धा लागली असून त्यातील पोलिसांच्या स्मार्टपणाचा

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या योजनेत उल्लेखनीय सहभाग दाखविण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये स्पर्धा लागली असून त्यातील पोलिसांच्या स्मार्टपणाचा नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागतो आहे. नियम मोडणाऱ्यांना डिजिटल पेमेंटमध्ये दंडापेक्षा जास्त पैसे भरावे लागत असून त्याचा फायदा पोलिसांना नाही तर मध्यस्थ एजन्सीला होत आहे.वाहतुकीचे नियम मोडल्यावर आता पोलिसांकडून केला जाणारा दंड संबधितांला थेट स्वाईप मशिनद्वारे जमा करता येतो. पोलिसांचाही दंड असाच डिजिटल पेमेंटद्वारे करण्याबाबत आग्रह असतो. मात्र यात संबंधित नागरिकांचे जास्त पैसे जात असल्याचे निदर्शनास आले आहे. लक्ष्मीकांत बुलबुले यांना काही दिवसांपुर्वी पोलिसांनी प्रभात चित्रपटगृह चौकात नियमभंग केला म्हणून पकडले. त्यांना २०० रुपये दंड करण्यात आला. बुलबुले यांनी तो दंड आपल्या डेबिट कार्डद्वारे स्वाईप मशिनने जमा केला. त्यानंतर त्यांना त्यांच्या खात्यातून २०३ रुपये ४५ पैसे कपात झाल्याचा मेसेज मिळाला. जास्तीचे पैसे कसले, याबाबत त्यांनी पोलिसांना विचारल्यावर त्यांनीही आम्हाला काही माहिती नाही, असेच सांगितले.त्यामुळे बुलबुले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांच्याकडे तक्रार केली. संभूस यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त मोराळे यांच्याशी संपर्क साधला व विचारणा केली. त्यावर मोराळे यांनीही जादा रक्कम पोलिसांकडे जमा होत नाही असे सांगितले. मात्र ही रक्कम बँक व पोलीस यांच्यातील या डिजिटल पेमेंट व्यवस्थेसाठी म्हणून जी मध्यस्थ कंपनी काम करते आहे, त्यांना मिळत असल्याचे स्पष्ट केले. ही बाब गैर असून तुमच्या सोयीसाठी नागरिकांनी भुर्दंड का सहन करायचा, असा सवाल संभूस यांनी केला. मोराळे यांनी त्यावर हा प्रकार नक्की काय आहे, याबाबत माहिती घेण्याचे आश्वासन दिले.संभूस म्हणाले, की पेट्रोल पंप, हॉटेल्स व अन्य काही ठिकाणीही स्वाईप मशिनचा वापर केला तर जास्तीचे पैसे द्यावे लागतात. केंद्र सरकार कॅशलेस पेमेंटसाठी आग्रही असेल तर त्यांनी हा भुर्दंड सहन करावा. आधीच एटीएममध्ये नोटांचा खडखडाट झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात असे डिजिटल पेमेंट करताना जास्तीचे पैसे द्यावे लागत असतील ती नागरिकांची एकप्रकारे अडवणूक करून केलेली लूटच आहे.एकीकडे नागरिकांना ‘कॅशलेस व्हा’, असे आवाहन करताना दुसरीकडे त्यासाठी वेगळे शुल्क आकारणे म्हणजे ही आर्थिक लूटच आहे. एटीएममध्ये नोटांचा खडखडाट करून नागरिकांना असहाय करायचे व नंतर त्यांच्याकडून पैसे उकळून काही कंपन्यांचे भले करायचे, असाच हा प्रकार आहे. त्याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. - लक्ष्मीकांत बुलबुले, नागरिक