शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जागेचा वाद उफाळण्याची चिन्हे

By admin | Updated: March 11, 2016 01:40 IST

वाघोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यांना डावलून महानगरपालिकेने बीआरटी नगर रस्ता थेट राज्य सरकारकडून जागा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे

आव्हाळवाडी : वाघोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यांना डावलून महानगरपालिकेने बीआरटी नगर रस्ता थेट राज्य सरकारकडून जागा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आमदारांना विचारात न घेता ही एक प्रकारे मुस्कटदाबी आहे. त्यामुळे होणाऱ्या घटनेस महापालिका व राज्य शासन जबाबदार राहील, असा इशारा माजी जि. प. सदस्य व ग्रामपंचायत सदस्य रामदास दाभाडे यांनी दिला आहे.नगर रस्ता बीआरटी सुरू करण्यासाठी वाघोली केसनंद फाटा येथील साधारण अडीच एकर जागा महापालिकेने ग्रापंचायतीकडे मागणी केली होती. त्याबदल्यात ग्रामपंचायतीने काही अटी घातल्या होत्या. पण त्या मागण्या पुणे महापालिकेने डावलून त्यांना विचारात न घेता मुंबई येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेतला. पुणे महापालिकेने वाघोली ग्रामपंचायतीला डावलून राज्य शासनाकडून परवानगी घेतली आहे. त्यामुळे हा एक प्रकारे कुटील बेत असून, ग्रामस्थांचा विचार न घेतल्याने हा वाद उफाळला आहे. मनसे अध्यक्ष संदीप सातव यांनी विरोध करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. बीआरटीवरून वाघोली गावामध्ये संतापाची लाट पसरली आहे. सरकारच्या मालकीची त्याच परिसरात दुसरी एक जागा आहे, ती महापालिकेला देण्याचे निर्णय घेतला असला, तरी पण कोणती जागा, त्याचा गट नंबर कोणता, अजून दुसरीकडे आहे का? यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे, की महापालिका सर्व जागा घेत आहे का? यामुळे ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते विचारात पडले आहेत. हा वाघोली ग्रामपंचायतीचा अपमानसरपंच संजीवनी वाघमारे यांनी सांगितले, की पालकमंत्र्यांशी बीआरटीविषयी एक ते दीड महिन्यापूर्वी, आम्ही ग्रामपंचायत सदस्य चर्चा करण्यासाठी गेलो असता, ते उपस्थित नव्हते. त्यांनी फोनवर सांगितले, की याविषयी बैठक बोलावून चर्चा करू. जागा शासनाची असली तरी वाघोली ग्रामपंचायतीचा हा अपमान आहे. आम्ही तातडीने ग्रामसभा बोलावून त्यामध्ये जो निर्णय होईल, तो करू.