शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडला सप्तसुरांचा नजराणा

By admin | Updated: October 29, 2016 04:26 IST

लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळविणारा सण म्हणजेच दिवाळी. सुख, समृद्धी, आनंदाची पखरण करणारा उत्सव. अशा चैतन्यमयी वातावरणात दिवाळीचा गोडवा वाढविण्याचा

पिंपरी : लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळविणारा सण म्हणजेच दिवाळी. सुख, समृद्धी, आनंदाची पखरण करणारा उत्सव. अशा चैतन्यमयी वातावरणात दिवाळीचा गोडवा वाढविण्याचा प्रयत्न लोकमत वृत्तपत्र समूहाने केला आहे. सुरेल आनंदाची पर्वणी अर्थात दिवाळी पाडवा पहाट मैफलीचे पिंपरी-चिंचवडशहरात प्रथमच केले आहे. जय मातृभूमी युवा मंच आणि राहुल कन्स्ट्रक्शन्स यांच्या सहयोगाने स्वरचैतन्य हा कार्यक्रम सोमवार, दि. ३१ आॅक्टोबरला होणार आहेदिवाळीत सूर, लय आणि ताल यांच्या अद्वितीय आविष्काराची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवयास मिळणार आहे. शास्त्रीय, सुगम आणि फ्युजनचा अनोखा नजराणा पेश होणार आहे. त्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी, पंडीत जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य शौनक अभिषेकी, प्रसिद्ध युवा गायिका सावनी शेंडे आदी गायन सादर करणार असून त्यांना प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक, अनय गाडगीळ (सिंथेसायझर), ओंकार दळवी (पखवाजवादक), तन्मय देवचके (हार्मोनियमवादक), हर्षद कानिटकर (तबलावादक), अभिजित भदे (ड्रम्स) साथ करणार आहेत. प्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक मँगो हॉलिडेज, ऐश्वर्यम कोर्टयार्ड हे आहेत. तसेच ‘आयबीएन लोकमत’ या कार्यक्रमाचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत. तसेच स्वीट पार्टनर काका हलवाई, गायत्री पैठणी सील्क सारीज्, द्वारकादास श्यामकुमार यांचे सहकार्य आहे. हा कार्यक्रम विनामुल्य असला तरी प्रवेशिका असणे आवश्यक आहे. लोकमत कार्यालयासह विविध ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वरमयी दिवाळी पहाटेस उपस्थित राहूल आनंदोत्सवात भर टाकावी, दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन लोकमत परिवारातर्फे केले आहे.(प्रतिनिधी)प्रवेश विनामूल्य लोकमत सखी मंच सभासद, त्यांच्या कुटुंबीयांसमवेत, वाचकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. चिंचवड येथील तानाजीनगर काकडे पार्क येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल प्रशस्त मैदानावर पहाटे ५.३० वा. हा कार्यक्रम होईल.कसे पोहोचावे? चिंचवडगावातून लिंक रस्त्याने काकडे पार्क, काळेवाडी पुलावरून केशवनगरमार्गे काकडे पार्क, पिंपरीतील उड्डाणपुलावरून लिंक रस्त्त्याने तानाजीनगरातील मैदानावर पोहोचता येणार आहे.