शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्यांचा अधिकाऱ्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 01:20 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे उभी पिके पाण्याअभावी जळून चालली असताना जुन्या कालव्याचे पाणी दौंड तालुक्यात अद्याप पोहोचले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज

यवत : दुष्काळी परिस्थितीमुळे उभी पिके पाण्याअभावी जळून चालली असताना जुन्या कालव्याचे पाणी दौंड तालुक्यात अद्याप पोहोचले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे विभागाच्या यवत उपविभागीय कार्यालयात जाऊन शाखा अधिकाऱ्याला घेराव घातला. या वेळी संतप्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शाखा अभियंत्यांची चांगलीच भंबेरी उडाली.यंदा पाऊसच झालेला नसल्याने खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा कमी आहे. उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. यामुळे दौंड तालुक्यातील शेती पाण्याअभावी अडचणीत आली आहे. त्यातच शासनाने जुन्या कालव्यातून (बेबी कॅनॉल) नदीतील पाणी शुद्धीकरण करून सोडले जाणार असल्याचे सांगितले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतीसाठी आवर्तन मिळू शकेल, असे सागितले होते. मात्र, कॅनॉलचे काम न झाल्याने पाणी सोडण्यास उशीर झाला. पाणी सोडण्यासाठी गळती बंद होऊन कामे पूर्ण होण्याची आवश्यकता आहे, असे कारण पाटबंधारे विभागातील अधिकारी शेतकऱ्यांना देत होते. मात्र, आता कामे पूर्ण झाली तरी पाणी येत नाही. अखेर आज संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढून याचा जाब विचारला. या वेळी पाटबंधारेचे शाखा अभियंता काळे, भाजपाचे तानाजी दिवेकर, भाजपाचे दौंड तालुकाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, दौंड तालुका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष उत्तमराव गायकवाड, दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरविंद दोरगे, बाबा शेळके, किसन दोरगे, राहुल अवचट व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)तीन दिवसांत पाणी पोहोचेल...शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहता, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता काळे यांनी तीन दिवसांत दौंड तालुक्यात जुन्या कालव्याचे पाणी पोहोचेल, असे आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. अखेर तोंडी आश्वासन मिळाल्यानंतर तीन दिवसांत पाणी न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांनी दिला.कामे पूर्णत्वास जात असताना आता नवीनच समस्या उभी राहिली असून, त्यासाठी पाटबधारे विभाग पाण्याचे योग्य नियोजन करीत नसल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी आज थेट पाटबंधारे विभागाच्या यवत कार्यालयात मोर्चा आणला.