शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

साईडपट्ट्या खोदल्या

By admin | Updated: April 29, 2017 03:58 IST

भामा-आसखेड धरणावरून पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येत असलेलली जलवाहिनी अगदी डांबरी रस्त्यालगत टाकली जात आहे.

आंबेठाण : भामा-आसखेड धरणावरून पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येत असलेलली जलवाहिनी अगदी डांबरी रस्त्यालगत टाकली जात आहे. त्यासाठी नियम पायदळी तुडवून रस्त्याच्या साईडपट्ट्या खोदल्या जात आहेत. याशिवाय मुख्य वर्दळीचा रस्ता अडविला गेल्याने संताप व्यक्त होत आहे.भांबोली व सावरदरी रस्त्यावरील असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ ही खोदाई सुरू आहे. ठेकेदाराने एमआयडीसीच्या रस्त्यांचे सर्व नियम पायदळी तुडवत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरूच ठेवले आहे. खोदाई करण्यासाठी पोकलेन मशिनरी वापरली जात असून त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच बनविलेल्या रस्त्याच्या चक्क साईडपट्ट्याच खोदल्या आहेत. तीव्र वळणाच्या ठिकाणीच वाहतूक एका बाजूने बंद करून एकाच लेनवरून येणारी आणि जाणारी वाहने काढून दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.भांबोली व सावरदरी येथील एमआयडीसीच्या रस्त्याच्या कडेने टाकण्यात येत असलेल्या या जलवाहिनीचे काम एल अँड टी कंपनीने तर धरणापासून चिंबळीफाटापर्यंतचे काम उपठेकेदार म्हणून सोनन इंजिनिअरिंग (पुणे) या कंपनीला दिले आहे. अनेक ठिकाणी रस्ता क्रॉसिंग करून जलवाहिनी टाकली असून तो खोदाई केलेला रस्ता पुन्हा पूर्ववत न करता त्याच अवस्थेत ठेवला जात आहे. खोदलेले रस्ते तसेच ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. (वार्ताहर)