शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल इंडियाचा रस्त्यांना साईड इफेक्ट

By admin | Updated: March 23, 2016 01:20 IST

केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रामपंचायती ‘आॅनलाईन’ जोडल्या जात आहेत. यासाठी रस्ते खोदले जात आहेत

राजगुरुनगर : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रामपंचायती ‘आॅनलाईन’ जोडल्या जात आहेत. यासाठी रस्ते खोदले जात आहेत; मात्र ठेकेदार ते दुरस्त करीत नाहीत. खेड तालुक्यातल्या लहान-मोठे सगळेच रस्ते खोदल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. केंद्र सरकारच्या योजनेचा भाग म्हणून सर्व ग्रामपंचायतींचा कारभार ‘आॅनलाइन’ होण्यासाठी ‘भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड’ ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीद्वारे ‘नॅशनल आॅप्टिक फायबर नेटवर्क’ कार्यक्रमाद्वारे सर्व ग्रामपंचायती आॅप्टिक फायबर केबलने जोडल्या जात आहेत. पुणे जिल्ह्यात बारामती, दौंड, खेड, शिरूर आणि आंबेगाव हे तालुके पहिल्या टप्प्यात या योजनेत घेण्यात आले आहेत. त्यानुसार नजीकच्या टेलिफोन केंद्राला ग्रामपंचायत आॅप्टिक फायबर केबलने जोडले जात आहे. या पाच तालुक्यांमधल्या ५३२ ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात जोडल्या जाणार आहेत. खेड तालुक्यातल्या १६० ग्रामपंचायती त्यात आहेत. मात्र, या उपक्रमाचा फटका रस्त्यांना बसत आहे. या योजनेचे ठेकेदार रस्ते उखडून टाकत आहेत. उखडलेले रस्ते त्यांनीच पूर्ववत करायचे असा करार आहे. मात्र, ठेकेदार फक्त केबल टाकण्यासाठी केलेला खड्डा माती आणि मुरूम बुजविण्यापलीकडे काही करीत नाहीत. त्यामुळे गावोगावचे रस्ते उखडलेले दिसत आहेत. या उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, ही त्या ग्रामपंचायतीच्या दृष्टीने समस्या झाली आहे. जेथे रस्ता अरुंद आहे, अशा ग्रामपंचायतींचा संपूर्ण रस्ताच उखडला गेला आहे. या ठेकेदारांकडून हे रस्ता दुरुस्तीचे काम कोण करवून घेणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी उपसा जलसिंचन योजनांच्या पाइपलाइन, पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन, सांडपाण्याची गटारे, कठडे यांचेही नुकसान या कामामुळे होत आहे. याबाबत ‘नॅशनल आॅप्टिक फायबर नेटवर्क’ विभागाचे विभागीय अधिकारी रोहिदास नाळे यांनी रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून, त्याने जेथे रस्ता उखडेल तिथे सिमेंट काँक्रिट वापरून रस्ता दुरुस्त केला पाहिजे. ठेकेदाराने रस्त्याच्या कडेने केबलसाठी खोदाई करायची आहे आणि काम झाल्यावर फुटपाथ पूर्ववत करू द्यायचे आहेत. केंद्र सरकारने राज्य सरकारशी यासाठी करार केला आहे, असे त्यांनी सांगितले. ठेकेदारांना तशा स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)