शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्वेतांग निकाळजेला अटक

By admin | Updated: February 7, 2015 23:59 IST

मागील दीड वर्षांपासून पोलिसांना विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला कुख्यात गुन्हेगार श्वेतांग ऊर्फ श्वेत्या भास्कर निकाळजे याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पुणे : मागील दीड वर्षांपासून पोलिसांना विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला कुख्यात गुन्हेगार श्वेतांग ऊर्फ श्वेत्या भास्कर निकाळजे याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ पिस्तुले आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी श्वेत्या निकाळजे (वय २६, रा. ३३५, मंगळवार पेठ, सध्या रा. समृद्धी अपार्टमेंट, आंबेगाव पठार) हा मागील दीड वर्षापासून जामिनावर बाहेर होता. शशिकांत चंद्रकांत मुरमुरे (२४, रा. ८६१, कसबा पेठ) आणि अक्षय बाबूराव चव्हाण (२३, रा. गुजरवाडी फाटा, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या निकाळजेच्या साथीदारांची नावे आहेत. आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपी श्वेत्याविरुद्ध भारती विद्यापीठ आणि ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा, शिवाजीनगर आणि फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा आणि दरोड्याच्या तयारीत असतानाचा तर येरवडा आणि समर्थ पोलीस ठाण्यात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी शशिकांत मुरमुरेविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. श्वेत्या व त्याच्या साथीदारांनी शिवाजीनगर न्यायालयातही गोळीबार केला होता. हडपसर येथील गुन्ह्यात वेळेत आरोपपत्र दाखल न झाल्याने श्वेत्याला जामीन मिळाला होता.गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्वेत्या आणि त्याचे साथीदार फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कमला नेहरू रुग्णालयाजवळ येणार असून, त्यांच्याकडे बेकायदेशीर शस्त्रे असल्याबाबतची माहिती पोलीस नाईक इरफान मोमीन यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांच्या सूचनेनुसार दोन पथके तयार करण्यात आली. दोन्ही पथकांनी रुग्णालयाजवळ सापळा रचला होता. श्वेत्या व त्याचे दोन्ही साथीदार त्याठिकाणी आल्यानंतर शनिवारी दुपारी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके, उपायुक्त जयंत नाईकनवरे, सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे, सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस नाईक इरफान मोमीन, हवालदार रमेश भोसले, रवींद्र कदम, संभा भोईटे, दिलीप मोरे, प्रकाश लोखंडे, प्रभाकर हिरगुडे यांच्या पथकाने कारवाई केली. (प्रतिनिधी)आरोपी शशिकांत मुरमुरेविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. श्वेत्या व त्याच्या साथीदारांनी शिवाजीनगर न्यायालयातही गोळीबार केला होता. हडपसर येथील गुन्ह्यात वेळेत आरोपपत्र दाखल न झाल्याने श्वेत्याला जामीन मिळाला होता.