हिंजवडी : शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये अग्निशामक यंत्रणेचा केवळ शो-पीस म्हणूनच वापर केला असल्याचे दिसून येत आहे. मुदत संपल्यानंतरही अग्निशामक यंत्रात ‘गॅस रीफिलिंग’ केलेला आढळला नाही. सहा-सहा महिने उलटूनही या यंत्रणेची तपासणी अनेक ठिकाणच्या शाळा व महाविद्यालयांत झालेली नाही. अनेक शाळांत ही यंत्रणा अडगळीत असून, ती सहजपणे हाताळता येईल अशी व्यवस्थाही आढळून आली नाही. शहर आणि ग्रामीण परिसरातील काही मोजक्या शाळा आणि महाविद्यालय सोडले, तर बहुतांश शाळेत यंत्रणाच उपलब्ध नाही. रीफिलिंगकडे दुर्लक्ष शहरातील व ग्रामीण भागातील १५ शाळा, महाविद्यालयांची प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी केली असता, ७ शाळांतील अग्निशामक यंत्रातील गॅस कालबाह्य आढळला. त्यात महापालिकेच्या १, जिल्हा परिषदेची एक, तर खासगीच्या पाच शाळांचा समावेश आहे. दोन महाविद्यालये व चार शाळांमधील यंत्रामध्ये मुदतीच्या आत गॅस रिफिलिंग झालेले आहे.कामचलाऊ प्रशिक्षण अग्निशामक यंत्रणेसंदर्भात संबंधित शाळा-महाविद्यालयांचे प्रशासन, तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीदेखील सतर्कता बाळगत नाहीत. अनेक शाळांमध्ये तर या यंत्राचा वापर बंधनकारक आहे हेदेखील माहीत नाही. या यंत्राची देखभाल, हाताळणीबाबतही कोणालाच शास्त्रशुद्ध ज्ञान नाही. प्रत्येक शाळा व महाविद्यालयात शासनाच्या आदेशानुसार केवळ कागदावरच आपत्कालीन व्यवस्थापन समिती आहे. प्रत्यक्षात यामध्ये समाविष्ट असणाऱ्या काही सदस्यांनासुद्धा याबाबत पूर्ण माहिती नाही अथवा प्रशिक्षणसुद्धा दिले गेले नाही. केवळ औपचारिकता नको अग्निशामक यंत्रणा शाळा-महाविद्यालयात केवळ औपचारिकता न राहता संबंधित शाळा-महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व यंत्रणा हाताळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याला वापरासंबंधी पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. या यंत्रणेकडे वेळोवेळी शालेय प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.(वार्ताहर)यंत्राची तपासणीच नाही सहा महिन्यांनंतरही यंत्राची तपासणीच केली जात नाही. गॅसची वर्षभराची एक्स्पायरी डेट असते. एका वर्षाने गॅस बदलणे आवश्यक आहे; परंतु अनेक ठिकाणी चार-पाच वर्षांनी अधिकाऱ्यांनी विचारणा केली, तरच संबंधित प्रशासनास जाग येते. आॅडिटमध्ये त्रुटी निघू शकते. या यंत्रावर रीफिलिग डेट (पुनर्भरण) व ड्यू डेटचे (एक्स्पायरी डेट) स्टिकर असते; पण असे स्टिकर यंत्रावर आढळले; परंतु त्यावरील मजकूर काहीच दिसत नाही, हे विशेष! देखभालीबाबत निष्काळजीपणा झाल्यास स्फोट होण्याची शक्यता अधिक असते.यंत्र हाताळणीबाबत माहितीच नाही४अग्निशामक यंत्र भिंतीला वर्षानुवर्षे लावलेले असते; परंतु संकटसमयी ते हाताळायचे कसे याची माहिती कोणालाही नसल्याची धक्कादायक माहिती अनेक शाळांमध्ये आढळली. हाताळणीसंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. प्रत्येक शाळेत हे यंत्र जणू ‘शो पीस’ ठरले आहेत.अनुदान नसल्याचे कारणखासगी संस्थांची बहुसंख्य शाळा-महाविद्यालयांनी अनुदानच नसल्याचे कारण पुढे करत अग्निशामक यंत्रणेला बगल दिली आहे. अनुदान नसल्याने अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येतात, अशी कारणे अनेक संस्थाचालक, प्रशासनाने पुढे केली आहेत.
शाळा, महाविद्यालयांतील अग्निशामक यंत्रणा ‘शो पीस’
By admin | Updated: December 26, 2016 03:18 IST