शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
3
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
4
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
5
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
7
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
8
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
9
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
10
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
11
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
12
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
13
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
14
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
15
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
16
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
17
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
18
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
19
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
20
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासातून शिकायला हवे - राजेंद्र भामरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 03:00 IST

राजेंद्र भामरे : रंगावली आणि दिव्यातून बाजीराव पेशवे यांना मानवंदना

पुणे : थोरले बाजीराव पेशव्यांनी केवळ २० वर्षांच्या कारकिर्दीत असामान्य कर्तृत्व गाजवले. मेहनत आणि चिकाटीनेच यशाची उंची गाठता येईल. इतिहासाचा अभ्यास करताना त्याच्यापासून योग्य बोध घ्यायला हवा. इतिहासामध्ये झालेल्या चुका लक्षात घेऊन त्या भविष्यात कशा टाळता येतील, याचा अभ्यास करायला हवा. भविष्याचा पाया भक्कम करण्यासाठी इतिहासातून शिकायला हवे, असे मत माजी पोलीस अधिकारी राजेंद्र भामरे यांनी व्यक्त केले.

निनाद, पुणे आणि निनाद नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे बाजीराव पेशवे यांच्या ३१८ व्या जयंतीनिमित्त सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रंगावली आणि ३१८ दिव्यातून बाजीराव पेशवे यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. पुणे विद्यार्थी गृहाचे उपकार्याध्यक्ष हणमंत भोसले, मुख्याध्यापक टी. आर. गोराने, निनाद पुणेचे उदय जोशी, उद्योजक अनिल गानू, रंजन पिंगळे, पुरुषोत्तम वाईकर, सतीश गांधी, अश्विनी गानू, सचिन देसाई, शेखर कोळेकर, विक्रम काळे आदी या वेळी उपस्थित होते. रंगावलीकार सुनील सोनटक्के आणि वैशाली सोनटक्के यांनी रंगावली रेखाटली. बाजीराव पेशवे यांच्या वरील निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. ईशा चव्हाण हिने प्रथम, आदित्य तायडे याने द्वितीय, युवराज मोहिते याने तृतीय, तर सानिका खांडेकर हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे निष्णात योद्धे होते. शिवाजीमहाराजांच्या तोडीचे कर्तृत्व त्यांनी गाजविले आणि मराठी साम्राज्याचा अटकेपार झेंडा त्यांनी फडकाविला. जगातील ज्या थोर लोकांनी असामान्य कर्तृत्व गाजविले ते कर्तृत्व त्यांनी स्वत:च्या देशासाठी आणि समाजासाठी केले.- हणमंत भोसले

टॅग्स :PuneपुणेPeshwaiपेशवाई