शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षागृहांना कमतरता कार्यक्रमांची

By admin | Updated: December 18, 2014 04:35 IST

शहरातील प्रेक्षागृहांपैकी चिंचवडमधील एकाच प्रेक्षागृहाला रसिकांचा प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित संततुकारमनगर व भोसरीतील प्रेक्षागृह मात्र कार्यक्रम आणि रसिकांअभावी ओस पडली आहेत

सुवर्णा नवले, पिंपरीशहरातील प्रेक्षागृहांपैकी चिंचवडमधील एकाच प्रेक्षागृहाला रसिकांचा प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित संततुकारमनगर व भोसरीतील प्रेक्षागृह मात्र कार्यक्रम आणि रसिकांअभावी ओस पडली आहेत.महापालिकेने शहराच्या विविध भागात उभारलेली प्रेक्षागृह उत्तम दर्जाची आहेत. सोई सुविधांची रेलचेल तरिही चांगले नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम मात्र मोठ्या प्रमाणावर होत नाहीत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे, संततुकारामनगर येथील आचार्य अत्रे तसेच कै. अंकुशराव लांडगे या प्रेक्षागृहांमध्ये ज्या संस्थांचे नाट्य प्रयोग झाले. त्या संस्थेच्या कलाकारांनी या प्रेक्षागृहांबद्दल प्रशंसा केली आहे. कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या या नाट्यगृहांपैकी केवळ चिंचवड येथील प्रेक्षागृहात सातत्याने कार्यक्रम होतात. अन्य दोन्ही प्रेक्षागृहांकडे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांनी तसेच रसिकांनी पाठ फिरवली आहे. संत तुकाराम नगर येथील प्रेक्षागृहात चिटफंड तसेच अन्य खासगी संस्थांचा एखादा दुसरा कार्यक्रम होतो. मनोरंजनाचे कार्यक्रमही होत नाहीत. येथे खासगी शाळांच्या स्रेहसंमेलनासाठी बुकींग होत नाही.