शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

तंबीमुळे लागले वेळेत निकाल

By admin | Updated: January 15, 2017 05:47 IST

‘तुमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून द्या; अन्यथा तुमच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठवून नका,’ अशी

पुणे : ‘तुमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून द्या; अन्यथा तुमच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठवून नका,’ अशी तंबी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिल्यामुळे बहुतेक परीक्षांचे निकाल ३४ दिवसांच्या आत जाहीर झाले आहेत. तसेच, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे सर्व निकालही येत्या २६ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करणे शक्य झाले आहे.प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिका तपासणीला टाळाटाळ केली जाते. त्यामुळे निकालास विलंब होतो. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘अनेक परीक्षांचे निकाल ३४ दिवसांमध्ये जाहीर करणे शक्य झाले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असूनही या परीक्षांच्या निकालाचे काम पूर्ण होत आले आहे. पूर्वी एका महाविद्यालयातील कॅप मध्ये २०० प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी येत होते; परंतु ही संख्या आता ६००पर्यंत गेल्याचे दिसून येत आहे. ‘‘प्राध्यापकांची संख्या वाढल्याने उत्तरपत्रिकांची तपासणी जलद झाली. विधी अभ्यासक्रमाचे निकाल वेळेत जाहीर व्हावेत, यासाठी विधी विद्याशाखेचे समन्वयक आणि अभ्यास मंडळांच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली एक टास्कफोर्स तयार करण्यात आला होते.’’ (प्रतिनिधी)- प्रथमवर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा बेसिक इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग या विषयाचा पेपर ९ डिसेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून फुटला होता. याबाबत पोलिसांचा तपास सुरू असून, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांचा जबाब नोंदविला आला आहे. पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निकाल जाहीर करण्याबाबत बीओईमध्ये निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण म्हणाले.