पुणे : शहरातील बहुतांश एटीएम केंद्र बंद. सुरू असलेल्या एटीएम बाहेर लागलेल्या रांगा...अनेक एटीएम केंद्रात पैसे असूनही तांत्रिक अडचणीने यंत्रातून रक्कम न मिळणे...अनेक एटीएममध्ये पैसे संपल्याचे दिसून येणे....बँकांतून ठरविल्यापेक्षी कमी रकमेचे वाटप करणे...अशा प्रचंड गोंधळ व नियोजनाच्या अभावामुळे शनिवारी नागरिकांनी चलनाची आणीबाणी अनुभवली. एटीएम केंद्रातून पैसे काढण्याच्या दुसऱ्याच दिवशी व्यवस्था कोलमडून पडली. शुक्रवारी देखील बहुतांश राष्ट्रीयीकृत, खासगी व इतर बँकांची एटीएम बंदच होती. जी एटीएम सुरू होती, त्यातील रक्कमही सकाळी लवकरच संपली असल्याचे चित्र होते. शहर व उपनगरांतील काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएमबाहेर व बँकांबाहेर गर्दी कायम होती. हजार व पाचशेच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी अथवा भरण्यासाठी विविध बँकांच्या शाखांमध्ये गर्दी कायम होती. एटीएममधून नव्या चलनी नोटा पुरविण्यासाठी शुक्रवारपासूनच एटीएम केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणे गरजेचे होते; मात्र शनिवारीदेखील शहरातील संपूर्ण एटीएम केंद्र सुरू करण्यातच बँकांना अपयश आले. एसबीआय, बँक आॅफ इंडिया, आयडीबीआय, बँक आॅफ महाराष्ट्रा, एचडीएफसी, भगिनी निवेदिता, आयसीआयसीआय, जनता सहकारी बँक, अशा सर्वच प्रकारच्या बँकांना आपली एटीएम केंदे्र संपूर्ण क्षमेतेने सुरू ठेवणे अशक्य झाले. काही एटीएम केंद्रात पुरेसे पैसे असूनही पैसे येत नव्हते. तेथील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन नोटा जाडीला कमी असल्याने यंत्राकडून त्या बाहेर येण्यात अडथळा निर्माण होत आहे. अशा तांत्रिक अडचणींमुळेदेखील अनेक एटीएम केंद्रे कुचकामी ठरली. रांगेत उभे राहून पदरी निराशाच1लोकांची मागणी अधिक असल्याने एटीएम केंद्रातील रक्कमदेखील काही वेळातच संपत होती. अशी यंत्रात पुन्हा रक्कम भरण्याची तरतूद बँकांकडून करण्यात आली नव्हती. त्यामुळे ज्या एटीएम केंद्रावर पैसे उपलब्ध होते, तेथे रस्त्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. इतकेच काय, तर लोक चक्क रस्त्यावर बसून आपला क्रमांक येण्याची वाट पाहत असल्याचे देखील काही ठिकाणी दिसून आले.2अनेक बँकांमध्येदेखील रकमेच्या तुटवड्याअभावी कमी रक्कम बदलून देण्यात येत होती. प्रत्येक व्यक्तीला चार हजार रुपयांच्या नव्या नोटा बदलून देण्याची सुविधा देण्यात आली आहे; मात्र अनेक बँकांत पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कमच बदलून दिली जात होती. त्यामुळे खूप वेळ रांगेत राहूनही नागरिकांच्या पदरात निराशाच पडली.
शहरात नव्या नोटांचा तुटवडा
By admin | Updated: November 13, 2016 04:29 IST