शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा

By admin | Updated: December 26, 2016 02:03 IST

आंबेगाव तालुक्यातील अधिकारी मंचर व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयासाठी मदत करणार आहेत. या रुग्णालयांमध्ये सध्या औषधांचा तुटवडा असून

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील अधिकारी मंचर व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयासाठी मदत करणार आहेत. या रुग्णालयांमध्ये सध्या औषधांचा तुटवडा असून शासनाकडून औषध पुरवठा होत नाही तर खरेदीसाठी पैसेही मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना बाहेरून विकत औषधे आणावी लागतात. यासाठी अधिकाऱ्यांनी मदत करावी, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले.तालुका समन्वय व पुनर्वलोकन समितीच्या बैठकीत सर्वांनी प्रतिसाद देत मदत करण्याचे आश्वासन दिले. मागील दोन वर्षापासून सरकारी दवाखान्यांमध्ये मागणीप्रमाणे औषध पुरवठा होत नाही. तसेच खरेदीसाठी पैसेही मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना बाहेरून विकत औषधे आणावी लागतात अशी अडचण मंचर व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सीमा देशमुख व डॉ. गीता कुलकर्णी यांनी बैठकीत मांडली. वळसे पाटील यांनी सांगितले, की प्रशासकीय अधिकरी महेश झगडे यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च टाळून कुपोषण निर्मूलनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे दिले. तशी काही मदत आंबेगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांनी मंचर व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयासाठी स्वेच्छेने करावी. अवसरी येथील इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निककॉलेजच्या आवारात रोडरोमिओंचा त्रास वाढला आहे. यासाठी मंचर पोलीस स्टेशनने येथे चौकी करावी तसेच सकाळ, दुपार, संध्याकाळ दामिनी पथक ठेवून बाहेरून येणाऱ्या मुलांचा बंदोबस्त करावा अशी सूचना त्यांनी केली. या निर्णयामुळे अनेक अडचणी निर्माण होणार असून, प्रथम लाभार्थ्याला पदरचे पैसे घालून वस्तू खरेदी करावी लागणार आहे तसेच जेव्हा मंजुरी मिळेल तेव्हा पैसे मिळतील. यामध्ये चिठ्ठी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होणार असल्याने गरजू व गरिबाला लाभ मिळेलच असे नाही. अशा प्रकारे शासन निर्णय घेऊन सगळ्याच योजना बंद करत चालले आहे अशी टीका वळसे पाटील यांनी या वेळी केली. बैठकीस प्रांत अधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार रवींद्र सबनीस, सभापती जयश्री डोके, उपसभापती सुभाष तळपे, सदस्य खंडू खंडागळे, नितीन केंगले, गटविकास अधिकारी राहुल काळभोर इत्यादी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)बॅँकेत खाती : अनेकांनी निधी दिला शासनाकडून निधी न मिळणारे खर्च भागविण्यासाठी मंचर व घोडेगाव ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या नावे बँकेत खाती काढली आहेत, या खात्यामध्ये यापूर्वी शरद सहकारी बँक, भीमाशंकर कारखाना अशा अनेकांनी निधी जमा केला आहे.  आंबेगाव तालुक्यातील लग्न, दशक्रिया विधी अशा कार्यक्रमांमध्येदेखिल पैसे दिले जाऊ लागले आहेत. या खात्यामध्ये अधिकाऱ्यांनी पैसे जमा करून सामाजिक कामाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व अधिकारी जेवढे शक्य होतील तेवढे पैसे या सामाजिक कामाला मदत करतील, असे आश्वासन प्रांत अधिकारी कल्याण पांढरे यांनी दिले.