शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

ग्राहक येती दुकाना, तोचि दिवाळी दसरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 08:20 IST

बाजारपेठा सुरू; रांगोळयांच्या पायघड्या घालून दुकानदारांनी केले स्वागत

पुणे : दोन महिन्यांपासून बंद असणाऱ्या बाजारपेठा मंगळवारी काही प्रमाणात का असेना खुल्या झाल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्येही आनंदाचे वातावरण होते. दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांनी ‘ग्राहक येती दुकाना, तोचि दिवाळी दसरा’...या भावनेतून ग्राहकराजाचे स्वागत केल्याचे चित्र पुण्या, मुंबईसह राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये पहायला मिळाले.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घातल्याने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांची कोंडी झाली होता. आता संसर्ग कमी झाल्याने निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आल्याने बाजारपेठेत नवचैतन्य संचारले होते.पुण्यात कोणी गुलाबपुष्प आणि पेढा देऊन ग्राहकांचे स्वागत केले. ‘करूनी घेऊ आपण व्हॅक्सिनेशन, सुरक्षित करू बाजारपेठ आणि नेशन’, ‘पाऊले चालती दुकानाची वाट, मास्क वापरून खरेदी करू, आपण राहू स्मार्ट’ असा संदेश देणाऱ्या ‘पुणेरी’ रांगोळ्यांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या. ग्राहकांच्या हातावर आधी ‘सॅनिटायझर’रुपी तीर्थ शिंपडून मगच ग्राहकाला दुकानात घेतले जात होते.दोन महिन्यानंतर बोहणीनाशिक शहरात गेल्या दोन महिन्यापासून दुकाने बंद आहेत. मंगळवारी (दि.१)दुकान उघडले आणि बोहणी झाली. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला.व्यापाऱ्यांच्या खूप अडचणी आहेत. त्याकडे सरकारने लक्ष पुरवले पाहिजे,त्यांना कर आणि अन्य बाबतीत सवलत दिली पाहिजे. यापुढे कोणतेही निर्बंधघालताना  व्यापारी व्यवसायिक त्यांचे अर्थकारण त्यांच्याकडील कामगारकारागिर वर्ग या सर्वच बाबतीत विचार केला पाहिजे.    - गिरीश येवला,     स्टेशनरी व्यवसायिक, नाशिकखेळण्याचे दुकान सुरू झाल्याने लहान मुले खुश आहेत. घरात राहून त्याच-त्याच खेळण्यांना मुले कंटाळले आहेत. काहींची खेळणी मोडली आहेत. त्या मुळे नवनवीन खेळणी विकत घेण्यासाठी मुलांनी पालकांकडे तगादा लावलेला दिसतो. त्यामुळे दुकानात आल्यानंतर लहान मुले आनंदी दिसत होती.    - निलेश पोरवाल, सायकल विक्रेतेथंडावलेले अर्थचक्र पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी, दुकानदारांचे चेहरे फुललेले होते. ग्राहकांनीही उत्साही गर्दी केल्यामुळे टाळेबंदी उठवल्याच्या पहिल्याच दिवशी अनेकांचा गल्ला चांगलाच भरला. मध्य पुण्यातल्या पारंपरिक बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली होती. असेच कमीजास्त चित्र २१ जिल्ह्यांमध्ये होते.