शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

दुकानदारांनीच केले दहाचे नाणे बाद

By admin | Updated: June 25, 2017 04:55 IST

दहाचे नाणे चलनात नसल्याची भीती नागरिकांमध्ये असून, तशी स्थितीही बाजारात आहे

मंगेश पांडे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : दहाचे नाणे चलनात नसल्याची भीती नागरिकांमध्ये असून, तशी स्थितीही बाजारात आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा, शासकीय यंत्रणा या ठिकाणी दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. खासगी दुकानांमध्ये मात्र या चलनांना कसलीही किंमत नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले. खिशात दहाचे नाणे आहे. मात्र, ते चलनातच येत नसल्याने अनेकांची तारांबळ उडते. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे जवळ ठेवायचे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडतो. बँकांकडून कसल्याही सूचना नसताना दुकानदारांकडून दहा रुपयांचे नाणे नाकारले जात आहे. त्यामुळे दहाच्या नाण्यांचे काय करायचे, असा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहत आहे. दहा रुपयांचे नाणे चलनातून हद्दपार झाल्याची अफवा पसरविली जात आहे. यामुळे दुकानदारदेखील नाणी स्वीकारत नाहीत. पीएमपी बस, एसटी बस, रेल्वे यासह मेडिकल, पेट्रोल पंप येथेही नाणे स्वीकारले जात नसल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, लोकमतने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये या ठिकाणी नाणे स्वीकारले गेले, तर दुसरीकडे खासगी दुकानदारांनी मात्र दहाचे नाणे बाद ठरविले. पेट्रोल पंप, चिंचवड स्टेशनचिंचवड स्टेशन येथील पेट्रोल पंपावर प्रतिनिधीच्या दुचाकीमध्ये ६० रुपयांचे पेट्रोल टाकले. यामध्ये पन्नास रुपयांची नोट आणि दहा रुपयांचे एक नाणे असे एकूण ६० रुपये दिले. पंपावरील कर्मचाऱ्याने नाणे स्वीकारून पेट्रोल दिले. महत्त्वाच्या सेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या ठिकाणी दहा रुपयांची नाणी स्वीकारली जात असताना किराणा दुकानदार, दूधविक्रेते, हॉटेल यासह इतर दुकानदारांकडून नागरिकांची अडवणूक केली जात आहे. हे नाणे चलनातून हद्दपार झाले असल्याचे सांगितले जाते. ही बाब स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली. आरक्षण खिडकीप्रतिनिधी : पंढरपूरला जाण्यासाठी उद्याचे तिकीट आरक्षित करायचेय. एसटी कर्मचारी : किती जणांचे अन् कोणत्या वेळेचे? प्रतिनिधी : उद्या सायंकाळी साडेसातचे, दोन जणांचे. एसटी कर्मचारी : एका व्यक्तीचे २४६ होतील. प्रतिनिधी : ठीक आहे. काही दहा रुपयांची नाणी आहेत, चालतील का?एसटी कर्मचारी : चालतात की; नाणी न घेतल्यास शिक्षेची तरतूद आहे. कॅन्टीनप्रतिनिधी : एक चॉकलेट हवंय.कॅन्टीनचालक : दस रुपये का है.प्रतिनिधी : ठीक है. दस का कॉईन है.कॅन्टीनचालक : दस का कॉईन अब कहॉ चलता है. प्रतिनिधी : यहॉँ के टिकट घर में तो दस कॉईन लेते है. कॅन्टीनचालक : उधर लेते होगे हमारे इधर नही चलता. पिंपरीतीलकिराणामाल दुकान प्रतिनिधी : एक साबण हवाय.दुकानदार : दस रुपये दो.प्रतिनिधी : दस का कॉईन है. दुकानदार : दस का कॉईन बंद हो गया. ये नही चलता.प्रतिनिधी : शेठजी, कॉईन चलता है.दुकानदार : हमारे इधर नही चलता.पिंपरी रेल्वेस्थानक, तिकीट खिडकीप्रतिनिधी : तळेगावला जाण्यासाठी तिकीट हवंय.महिला कर्मचारी : पाँच रुपये होता है.प्रतिनिधी : दस रुपये का कॉईन है.महिला कर्मचारी : चलेंगा दे दो.पीएमपी प्रवास वल्लभनगर ते पिंपरी प्रतिनिधी : पिंपरीला जायचे आहे, तिकीट किती?वाहक : दहा रुपये.प्रतिनिधीने दहा रुपयांचे नाणे देताच वाहकाने नाण्याबाबत कसलीही चर्चा न करता वल्लभनगर ते पिंपरीचे तिकीट हातात सोपविले. पिंपरीतील भाजी मंडईतही दहाचे नाणे स्वीकारले जात नसल्याचे दिसून आले. नाणे स्वीकारण्यास भाजीविक्रेत्यांकडून नकार दिला जात आहे. दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याने ते घेतले जात नसल्याचे ग्राहकांना सांगण्यात येते. यामुळे ग्राहकांची परवड होते.