शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तुळशीबागेतील भीषण आगीत दुकान खाक

By admin | Updated: February 4, 2015 00:27 IST

तुळशीबागेतील कपड्यांच्या दुकानाला आग लागून कपडे, लेदर बॅग, चप्पल असा माल बेचिराख झाला. आगीचे स्वरूप भयंकर होते.

पुणे : तुळशीबागेतील कपड्यांच्या दुकानाला आग लागून कपडे, लेदर बॅग, चप्पल असा माल बेचिराख झाला. आगीचे स्वरूप भयंकर होते. आज मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास लागलेली ही आग पहाटे ४ च्या सुमारास शमली. जीवितहानी झाली नाही. सिंंहगड रस्त्यावरील माणिकबागेत दूध डेअरीला पहाटे सव्वादोनच्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले.बुधवार पेठेतील वाकणकर निवास इमारतीत तळमजल्यावर २ हजार चौरस फूट आकाराचे दुकान असून, आतमध्ये ४ ते ५ कप्पे करून दुकाने थाटण्यात आली होती. महाराष्ट्र बँकेच्या मागील परिसरात, रहिवासी भाग असलेल्या ठिकाणी ही आग लागली. आगीची माहिती समजताच अग्निशामक दलाचे ९ बंब व २ टँकर एकापाठोपाठ घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनाग्रस्त दुकानाकडे जाण्यासाठी दलाच्या कर्मचाऱ्यांना लोखंडी रेलिंंगचा अडथळा आला. तो कापून बंब दुकानाजवळ नेऊन पाण्याचा फवारा मारण्यात आला. शेजारील इमारतीतील रहिवाशांना घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.या दुकानात पत्र्याची शेड करून ४-५ छोटी दुकाने तयार करण्यात आली होती. या पत्र्यांमुळे आगीपर्यंत पाणी पोचत नव्हते. आगीच्या धगीमुळे पत्रे खाली पडल्याने कपडे, लेदर बॅगा व चप्पल अशा वस्तू बेचिराख झाल्या. अर्ध्या तासात आग आटोक्यात आली आणि पहाटे ४ च्या सुमारास पूर्णपणे शमली. दुकानमालक केदार वाकणकर यांना या आगीमुळे मोठा धक्का बसला. आगीत ५ लाख रुपये किंमतीच्या साहित्याचे नुकसान झाले असावे, असा अग्निशामक दलाचा अंदाज आहे. आगीचे कारण समजलेले नाही. अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, स्थानक अधिकारी प्रकाश गोरे तसेच समीर शेख, राजेश जगताप, संजय रामटेके, गजानन पाथ्रुडकर यांच्यासह ३०-४० कर्मचारी घटनास्थळी उशिरापर्यंत आग शमविण्याचे प्रयत्न करीत होते. (प्रतिनिधी)४आगीची दुसरी दुर्घटना सिंंहगड रस्त्यावरील माणिकबागेत झाली. पहाटे सव्वादोनच्या सुमारास आगरवाल डेअरी या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानास आग लागली. नागरिकांनी ही माहिती दलास कळविल्यानंतर अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली गेली. दुकानमालक घटनास्थळी आल्यानंतर दुकानाचे कुलूप उघडून पाण्याचा मारा करण्यात आला. स्वयंपाकाचे दोन सिलिंंडर बाहेर काढण्यात आले. त्यातील एक सिलिंंडर गळका होता. दुकानातील वायरिंग पूर्णपणे जळाले असून आगीचे कारण समजलेले नाही. विद्युत विभागाच्या अहवालानंतर ते समजू शकेल. ४ दुकानात पोटमाळा काढून दुग्धजन्य पदार्थ तेथे ठेवले होते. ते व फर्निचर आगीत जळाले. दुपारी अडीचच्या सुमारास डेअरी बंद करण्यात आली होती. सिंंहगड रस्ता अग्निशामक दलाचे प्रमुख प्रभाकर उमराटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आग शमविण्यासाठी प्रयत्न केले. तुळशीबागेतील अरुंद बोळात लागलेली आग शमविताना अग्निशामक दलास मोठा अडथळा आला. मध्यंतरी सुरक्षिततेच्या कारणास्तव तुळशीबागेत पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त होता. मात्र, आगीसारख्या दुर्घटनांमध्ये तुळशीबाग असुरक्षितच असल्याचे आजच्या घटनेवरून दिसून आले. महाराष्ट्र बँकेच्या इमारतीच्या मागील भागातून तुळशीबागेकडे जाताना सुरूवातीलाच दुर्घटना झाली. या भागात लोखंडी रेलिंंग लावण्यात आले होते. त्यामुळे बंब आतमध्ये जाण्यास अडथळा आला. मात्र, अरूंद बोळ लक्षात घेऊन बाबू गेनू चौकाच्या बाजूनेही बंब आणून पाण्याच्या पाइपलाइन आगीपर्यंत नेत आग शमविण्याचे प्रयत्न सुरू केले गेले. महानगरपालिकेनेच गर्दीमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ही रेलिंंग लावली होती. त्याला असलेल्या कुलुपाची किल्ली कोणाकडे आहे, हे माहिती नसल्याने पाचच मिनिटांत रेलिंंग तोडण्यात आली. स्थानिक अधिकारी प्रकाश गोरे यांनी या माहितीस दुजोरा दिला.