शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांना पैसे मिळाले

By admin | Updated: April 8, 2016 00:59 IST

नारायणगाव बसस्थानकालगत असलेल्या ६० गाळेधारकांना अखेर न्याय मिळाला असून, सर्व गाळेधारकांनी स्थानिक नेत्याला दिलेले प्रत्येकी एक लाख रुपये नेत्याने परत

नारायणगाव : नारायणगाव बसस्थानकालगत असलेल्या ६० गाळेधारकांना अखेर न्याय मिळाला असून, सर्व गाळेधारकांनी स्थानिक नेत्याला दिलेले प्रत्येकी एक लाख रुपये नेत्याने परत केल्याने गाळेधारकांमध्ये समाधान व्यक्त केले. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळेच गाळेधारकांमध्ये एकी निर्माण होऊन सर्व गाळेधारकांना रक्कम मिळाली. नारायणगाव बसस्थानकालगत असलेल्या जुन्नर रोडवर ६० गाळे आहेत. या गाळेधारकांकडून स्थानिक नेत्याने प्रत्येकी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. गाळेधारकांनी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपये, तर काहींनी २ लाख रुपये दिले होते. ही रक्कम या नेत्याच्या पतसंस्थेत गाळेधारकांच्याच खात्यात जमा केली व गाळेधारकांच्या चलनावर सेल्फ अशा सह्या घेऊन ती रक्कम काढून घेतली. ज्या गाळेधारकांनी १ लाखापेक्षा कमी रक्कम दिली, अशा गाळेधारकास जरब बसावी, यासाठी ग्रामपंचायत व स्थानिक गुंड यांच्या माध्यमातून या नेत्याने बाळू व शंकर जाधव यांचा गाळा ताब्यात घेतला. त्यांच्या भांड्याच्या दुकानातील सर्व साहित्य जप्त केले होते. या प्रकारानंतर सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी व गावगुंड एकूण ३१ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने ६० गाळ्यांच्या जागेची मालकी कोणाची, याबाबत मोजणी केली असता, गाळ्यांची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गाळेधारकांनी दिलेले पैसे बुडणार, असे वाटले होते. याबाबत ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर प्रथम ४५ गाळेधारक एकत्र आले व त्यांनी दिलेल्या पैशाची मागणी केली आणि पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगितले.नेत्याने सर्वांना पैसे देण्याचे कबूल केले. त्यानुसार, ५ एप्रिलला २३ जणांना, ४ एप्रिलला २० तर आज ७ गाळेधारक असे एकूण ५० गाळेधारकांना घेतलेली रक्कम परत दिली. (वार्ताहर)