शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! रुग्णांचे रेमडेसिविर काळाबाजारात विकणाऱ्या परिचारिकेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या फॉर्मासिस्टला ही इंजेक्शन एका कोविड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या फॉर्मासिस्टला ही इंजेक्शन एका कोविड सेंटरमध्ये काम करणारी परिचारिकाच पुरवत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. रुग्णाला पहिल्या दिवशी दिल्या जाणाऱ्या दोन इंजेक्शनपैकी ही परिचारिका फक्त एकच इंजेक्शन देत आणि दुसरे इंजेक्शन काळाबाजारात विकत असल्याचे आढळून आले आहे.

रिबिका विनोद वैरागर (वय ३५, रा. मासाळ चाळ, पिसोळी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून ४ व अंकित सोलंकी याच्याकडून ३ अशी ७ रेमडेसिविर इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. रिबिका ही हडपसर येथील एका खासगी कोविड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून काम करीत आहे.

अंकित विनोद सोलंकी (वय २६, रा. सुखवानी कॉम्प्लेक्स, दापोडी) या फार्मासिस्टला कोंढवा पोलिसांनी अगोदर अटक केली होती.

कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना अंकित सोलंकी हा कोंढव्यातील जायका हॉटेलजवळ रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सय्यद यांनी साध्या वेशामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व पोलीस अंमलदार यांच्या पथकाला बनावट ग्राहक तयार करून इंजेक्शन घेण्यास पाठविले. या वेळी सोलंकी याने अंमलदाराला जायका हॉटेलच्या बाजूला नेऊन त्यांना दोन इंजेक्शन दाखविले. एका इंजेक्शनसाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तसेच एका इंजेक्शनसाठी १० हजार रुपये रोख स्वीकारले. नंतर १० हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात मागणी करत होते. या वेळी पोलिसांनी छापा टाकून या फार्मासिस्टला पकडले होते.

अंकित सोलंकी याने अगोदर पोलिसांची सातत्याने दिशाभूल केली. इंजेक्शन कोठून मिळविली, याची त्याने वेगवेगळी कारणे सांगितले. ती सर्व खोटी निघाली. त्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यावर त्याने खरा प्रकार सांगितला. त्याला पकडले, त्याच्या अगोदर त्याचा एका महिलेला फोन झाला होता. त्याबाबत चौकशी केल्यावर या महिलेने इंजेक्शन आणून दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अंकितला पुन्हा या महिलेला फोन करायला सांगितले. त्यानुसार त्याने फोन केल्यावर ती ४ इंजेक्शन घेऊन आली. पोलिसांनी तिला पकडले. तिच्याकडे चौकशी केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला.

अशी करत होती इंजेक्शनची चोरी

रिबिका ही हडपसर येथील एका कोविड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून कामाला आहे. कोविड रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनचा ६ इंजेक्शनचा कोर्स असतो. त्यापैकी २ इंजेक्शन्स पहिल्या दिवशी दिली जातात व नंतर दररोज एक अशी पुढील चार दिवस इंजेक्शन दिले जाते. हे काम परिचारिकाच करतात. रुग्णाला पहिल्या दिवशी इंजेक्शन देताना रिबिका दोनऐवजी फक्त एकच इंजेक्शन देत असे. दुसरे इंजेक्शन ती चोरत असे. त्यानंतर ती ते बाहेर काळाबाजारात विकत असे.

७ इंजेक्शन पोलिसांनी केली जप्त

अंकित याला पोलिसांनी अटक केली. तेव्हा त्याच्याकडे २ इंजेक्शन होती. आणखी एक इंजेक्शन त्याच्या गाडीच्या डिकीत पोलिसांना मिळाले. याशिवाय वापरलेल्या इंजेक्शनच्या ५ बाटल्या डिकीत आढळून आल्या. तसेच रिबिकाकडील ४ इंजेक्शन अशी ७ इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. तिने आणखी कोणा कोणाला ही इंजेक्शन दिली याचा तपास पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे करीत आहेत.