शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या ऑनलाइन उपस्थितीत शिवशाहिरांचा आज सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवचरित्र घराघरांत पोहोचविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शिवचरित्र घराघरांत पोहोचविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. तिथीने त्यांचा वाढदिवस नागपंचमीच्या दिवशी येत असल्याने शुक्रवारी (दि. १३) पुरंदरे यांचा आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात सकाळी ११ वाजता नागरी सत्कार होणार आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, खासदार विनय सहस्रबुद्धे ,छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि महापौर मुरलीधर मोहोळ या वेळी उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुरंदरे यांचे अभीष्टचिंतन करणार आहेत.

शतकवीर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी गुरुवारी (दि. १२) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसृष्टी येथे १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

जगदीश कदम यांनी सांगितले की बाबासाहेब पुरंदरे १३ ऑगस्ट २०२१ रोजी तिथीनुसार शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्त मोजक्या नामवंतांच्या उपस्थितीत त्यांचा नागरी सत्कार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विशेष कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होतील. १४ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, मनसे प्रमुख राज ठाकरे व भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांची उपस्थिती असणार आहे. तर १५ ऑगस्ट रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पुरंदरे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचा समारोप होईल.

“बाबासाहेबांच्या शंभरीनिमित्त प्रलंबित शिवसृष्टीचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे. या संकल्पाला या सोहळ्यामुळे बळ लाभेल,” असा विश्वास सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केला. बाबासाहेबांच्या शतकी वाढदिवसानिमित्त येत्या वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले असल्याचे कदम म्हणाले. कोरोनातील सर्व नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम होत असल्याने प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन समितीने केले. हा सोहळा @Shivsrushti Puneofficial या अधिकृत फेसबुक पेजवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

चौकट

समारोह समितीत मान्यवरांचा समावेश

बाबासाहेब पुरंदरे अभीष्टचिंतन समारोह समितीमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (तंजावर), भारतरत्न सचिन तेंडुलकर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, विख्यात गायक शंकर महादेवन, ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, प्रमोद चौधरी, उद्योजक प्रतापराव पवार, क्रेडाई पुणेचे अध्यक्ष अनिल फरांदे आदींचा समावेश आहे.