शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे दहा उमेदवार जाहीर

By admin | Updated: November 15, 2016 02:57 IST

लोणावळा शहर शिवसेनेकडून नगर परिषद निवडणुकीतील दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान नगरसेवक सुनील इंगूळकर यांना पुन्हा

लोणावळा : लोणावळा शहर शिवसेनेकडून नगर परिषद निवडणुकीतील दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान नगरसेवक सुनील इंगूळकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत ५ महिलांचा समावेश आहे.तालुकाप्रमुख राजू खांडभोर व लोणावळा शहरप्रमुख राहुल शेट्टी यांनी यादी जाहीर केली. उमेदवारांची दुसरी यादी व नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिवसेना मंगळवार, दि. १५ रोजी जाहीर करणार असल्याचे शहरप्रमुख शेट्टी यांनी सांगितले.वलवण प्रभाग क्र. ३ मधील अनुसूचित जाती पुरुष जागेसाठी मधूकर गायकवाड, नांगरगाव प्रभाग क्र. ४ येथील सर्वसाधारण जागेसाठी सुनील इंगूळकर व सर्वसाधारण स्त्री जागेसाठी मंदा म्हाळसकर, लोणावळा नगर परिषद कार्यालय या प्रभाग क्र. ६मधील सर्वसाधारण स्त्री जागेसाठी शिवसेना शहर महिलाध्यक्षा संगीता कंधारे, आगवाला चाळ या प्रभाग क्र. ७मध्ये सर्वसाधारण जागेसाठी शिवसेना माजी शहरप्रमुख शिवदास पिल्ले व अनुसूचित जाती स्त्री जागेसाठी करुणा चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. खंडाळा प्रभाग क्र. ९ येथील सर्वसाधारण स्त्री जागेसाठी जयश्री खराडे, तर अनुसूचित जमाती जागेसाठी अशोक गवारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जुना खंडाळा प्रभाग क्र. १० येथील इतर मागास वर्ग जागेसाठी माजी नगरसेवक गणेश इरले यांना, तर भुशी रामनगर प्रभाग क्र. १२ येथील सर्वसाधारण जागेवर माणिक मराठे व अनुसूचित जाती स्त्री जागेवर अनिता चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.केंद्रात व राज्यात भाजपा-शिवसेनची युती असली, तर लोणावळा काही जागावर एकमत न झाल्याने शिवसेना व भाजपा एकमेकांच्या समोर उमेदवार देऊन लढणार आहेत. भाजपानेदेखील त्यांची ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच शिवसेनेही ११ उमेदवारांची यादी जाहीर करुन जशास जसे उत्तर दिले आहे.