शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

काळूसमध्ये शिवसेनेच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ

By admin | Updated: October 11, 2014 06:49 IST

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुरेशगोरे यांच्या काळूस (ता. खेड) येथील सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याची तक्रार दाखल झाली आहे.

चाकण: खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुरेशगोरे यांच्या काळूस (ता. खेड) येथील सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याची तक्रार दाखल झाली आहे. कोपरा सभा सुरु असताना आलेल्या तीस ते पस्तीस जणांच्या जमावाने गोरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे सरचिटणीस डॉ. शैलेश मोहिते यांच्यासह १८ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे यांची सभा सुरु असताना डॉ.शैलेश मोहिते व नीलेश जेधे यांच्यासह सुमारे तीस ते पस्तीस जणांचा जमाव शिवागाळ करीत उमेदवार सुरेश गोरे यांच्या दिशेने चालून आला. कार्यकर्त्यांनी गोरे यांना घोळक्यात घेऊन त्यांच्या वाहनापर्यंत नेले. मात्र, आक्रमक कार्यकर्ते गोरे यांचा पाठलाग करीत वाहनापर्यंत आले असता महिलांनी गोरे यांच्या वाहनाला कडे केले. त्यानंतर सभेला आलेल्या नागरिकांनी वाट दिसेल तेथून पळ काढला. या घटनेनंतर उमेदवार गोरे , शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आणि मारहाण झालेल्या महिला यांनी चाकण पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. शिवसेनेच्या विजया शिंदे यांनी सांगितले की, शिवसेनेच्या कार्यकर्त्या यशोदा जगताप, शशिकला घोडके यांच्यासह पाच महिलांना मारहाण झाली आहे. यावेळी पोलीस ठाण्यात खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेश जवळेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, उपजिल्हाप्रमख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख अ‍ॅड.गणेश सांडभोर, विजया शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.डॉ. शैलेश मोहिते , शरद मोहिते ,धैयशील पानसरे, सुखदेव पानसरे, निलेश जेधे यांच्यासह अठरा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.दरम्यान, सभेत गोंधळ घालण्याचा प्रकार हा शिवसेनेचे उमेदवार व कार्यकर्त्यांचा पूर्वनियोजित बनाव आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली. ते म्हणाले, गोरे यांच्या गाडीतल काही जणांना आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. त्यांच्यातील काही महिलांनी कपडे फाडून बनाव केला. (वार्ताहर)