हडपसर : जागतिक नकाशावर या प्रभागातील सीटीमुळे नाव आले असले तरी सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या अनेक वर्ष तशाच असल्याने मतदारांना बदल हवा आहे. आम्ही प्रभागाचा कायापालट करु. त्यामुळे शिवसेनेचे सर्व उमेदवार बहुमतांनी निवडून येतील, असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.प्रभाग क्र. २२ मधील शिवसेनेचे उमेदवार सुनिल उर्फ अप्पा गायकवाड, समीर तुपे, सुवर्णा सतिश जगताप, गीतांजली आरु यांची आकाशवाणी, बनकर कॉलनी, सातव प्लॉट या परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांनी उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी अमोल हरपळे, अॅड.के.टी आरु, बबनराव गायकवाड, युवराज गायकवाड, सतिश जगताप, सचिन तुपे, राजेंद्र आरु, प्रकाश महाजन, प्रवीण टिळेकर, रंगनाथ भंडारी, अजित भोसले यांच्यासह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यास कोणीच प्रयत्न केला नाही. आमचा मानस प्रभागाचा विकास नियोजनबद्ध करण्याचा आहे, असे आश्वासन यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांना दिले. आकाशवाणी, बनकर कॉलनी, सातव प्लॉट या परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जावून उमेदावारांनी भेटी गाठी घेवून त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
शिवसेना प्रभागाचा कायापालट करेल
By admin | Updated: February 14, 2017 02:20 IST