शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला गरज गनिमी काव्याची

By admin | Updated: July 25, 2016 01:00 IST

शिवसेनेच्या वतीने प्राधिकरण येथे झालेल्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाच्या एककलमी कार्यक्रमाबद्दल जोरदार टीका करण्यात आली.

पिंपरी : शिवसेनेच्या वतीने प्राधिकरण येथे झालेल्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाच्या एककलमी कार्यक्रमाबद्दल जोरदार टीका करण्यात आली. महापालिकेत भाजपाशी युती करायची किंवा नाही, याबद्दल पक्षप्रमुख निर्णय घेतील. मात्र, गाफील राहू नका. सर्व जागांवर तयारी करा, असेही नेत्यांनी आपल्या भाषणातून सूचित केले. सत्तेसाठी वेळप्रसंगी गनिमी काव्याची गरज असल्याचेही मत व्यक्त केले.लेवा पाटीदार भवनातील मेळाव्यास जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, शहरप्रमुख राहुल कलाटे, महापालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे, युवाप्रमुख अमित गावडे आदी उपस्थित होते. भाजपाने शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्याने आजच्या मेळाव्यात याबाबत कोणता निर्णय होणार याबाबत चर्चा होती. यावेळी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनीही सत्तेत सहभागी असतानाही भाजपाकडून सुरू ठेवलेल्या एककलमी कार्यक्रमाबद्दल नाराजी व्यक्त केली. गुलाबराव पाटील म्हणाले, ‘‘युतीबाबत चिंता करीत बसू नका. नगरसेवक व्हायचंय, ही खूणगाठ बांधा. मतदारांना विश्वास द्या. पक्षाच्या उमेदवाराला ताकद द्या. खासदार आढळराव म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यतीबाबत कसब्यातील नेते आमच्या परिसरात येऊन श्रेय घेतात. नाशिक रेल्वे, महामार्गाचेही श्रेय स्वतकडे घेतात. पंतप्रधानांचे काम चांगले असले, तरी खालच्या पातळीवर कीड लागलीय त्याबद्दल अस्वस्थता वाटते. त्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आठवड्याला पुण्यात येतात. ते पक्षाची ताकत वाढवायला लागलेत. त्यामुळे भ्रमात राहू नये.’’खासदार बारणे म्हणाले, ‘‘न केलेल्या कामाचे श्रेय इतर पक्ष घेत आहेत. जाहिराती अ‍ॅप वापरून दिशाभूल करीत आहेत. घोषणांचा बाजार मांडला आहे. आपण सत्तेत असलो तरी सत्ता जमा झालेलो नाही. युतीचा निर्णय पक्षप्रमुखच घेतील तो मान्य राहील.’’ डॉ. कोल्हे यांनी युतिचा निर्णय पक्षप्रमुख घेतील असे सांगितले. आमदार चाबुकस्वार म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाशी युती केली तरी फायदा आणि नाही केली तरी फायदाच आहे.’’ वक्त्यांनी युतीबाबत थेट भाष्य न करता, गनिमी काव्याने लढण्याचा संकेत दिला. राहुल कलाटे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)