शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर शहराच्या प्रवेशद्वाराला शिवरायांचे नाव

By admin | Updated: March 21, 2017 04:59 IST

जुन्नर शहराच्या प्रमुख प्रवेशद्वाराला (वेशीला) ‘छत्रपती शिवाजीमहाराज प्रवेशद्वार’ व नगर परिषदेच्या व्यायामशाळेला

जुन्नर : जुन्नर शहराच्या प्रमुख प्रवेशद्वाराला (वेशीला) ‘छत्रपती शिवाजीमहाराज प्रवेशद्वार’ व नगर परिषदेच्या व्यायामशाळेला ‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व्यायामशाळा’ असे नाव देण्याचा ठराव नगरपालिकेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी दिली. विशेष सभेसाठी शिवसेना गटनेते दीपेश परदेशी, समीर भगत, आविन फुलपगार, नगरसेविका अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर आदी या वेळी उपस्थित होते.छत्रपती शिवाजीमहाराज प्रवेशद्वार, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व्यायामशाळा असे नाव देण्याची सूचना नगरसेविका अंकिता गोसावी यांनी मांडली होती. शिवसेना गटनेते दीपेश परदेशी यांनी ठरावास अनुमोदन दिले. नगरपालिकेची वादग्रस्त व अपूर्ण अवस्थेत असलेली पाणीपुरवठा योजना, तसेच जलशुद्धीकरण यंत्रणा जर ठेकेदाराने दोन महिन्यांत पूर्ण करून दिली नाही, तर ठेकेदाराची संपूर्ण अनामत व दंडात्मक रक्कम नगरपालिकेत जमा करून कारवाई करण्याची सूचना नगरसेवक समीर भगत यांनी मांडली. त्यास अविनाश कर्डिले यांनी अनुमोदन दिले. कुकडी नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी, तसेच शहरातील बांधकाम पूर्ण होत असलेली भाजी मंडई लवकर सुरू करण्यासाठी पूर्तता करून घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. नागरिकांना जन्मदाखले, ना-हरकत प्रमाणपत्र, तसेच नगरपालिकेशी संबंधित विविध कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी नागरी सुविधा केंद्र उभारण्यात यावे, ठेकेदारी पद्धतीने पार्किंग व्यवस्था सुरू करणे, शहरातील पाईप गटारकामे व रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना सभेत मंजुरी देण्यात आली. सन २०१७-२०१८ साठी दलित वस्ती, दलितेतरवस्ती, जिल्हा नगरोत्थान १४ वा वित्त आयोग आदी विविध योजनाअंतर्गत प्रस्ताव पाठविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. (वार्ताहर)