शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवरायांची प्रेरणा देशासाठी मोठी’

By admin | Updated: March 17, 2017 01:43 IST

शिवरायांचा स्वाभिमान तसेच पे्ररणा व विचार देशाला घडवत राहिले़ ‘लाचारीने झुकणार नाही, मातीसाठी मरणार’ असा संदेश देणारे एकमेव

नारायणगाव : शिवरायांचा स्वाभिमान तसेच पे्ररणा व विचार देशाला घडवत राहिले़ ‘लाचारीने झुकणार नाही, मातीसाठी मरणार’ असा संदेश देणारे एकमेव छत्रपती शिवाजीराजे आहेत़ देशावर कुठलेही संकट किंवा अतिक्रमण असो, मुंबईतील हल्ला असो, कारगिलचा हल्ला असो किंवा जम्मू काश्मीरमधील पूंछ येथील लढाई असो, या सर्व लढायांमध्ये सर्वांत जास्त शहीद होणारांची संख्या ही महाराष्ट्रातील आहे. कारण मातीसाठी मरणार, हाच तर संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे़, असे मत शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी नारायणगाव येथे व्यक्त केले़ राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिवचरित्रावर व्याख्यान देताना नितीन बानगुडे पाटील बोलत होते़ या वेळी जि. प. गटनेत्या आशाताई बुचके, सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, ललिता चव्हाण, अर्चना माळवदकर, रमेश खुडे, शरद चौधरी, संतोष खैरे, गणेश कवडे, सुजित खैरे, जंगल कोल्हे, योगेश पाटे, बाळासाहेब पाटे, संतोश दांगट, अनिल खैरे, ज्ञानेश्वर औटी, आरीफ आतार, योगेश गांधी, भागेश्वर डेरे, राजेश बाप्ते, मंदार पाटे, मयूर विटे, रोहित भूमकर, अमोल जगताप, संदीप मुळे उपस्थित होते़ दरम्यान, प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगाव ते शिवनेरी अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत ५०० हून अधिक युवकांनी सहभाग घेतला होता़ नारायणगाव बाजारपेठेतून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विरोबा मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, औंदुबर स्वराज्य मित्र मंडळ, कुलस्वामिनी मित्र मंडळ आदींनी सहभाग घेतला होता़सत्यशील शेरकर म्हणाले, की तिथी असो तारीख जुन्नर तालुक्यात शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो़ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा ३६५ दिवस जरी केला तरी तो कमीच आहे़ माऊली खंडागळे म्हणाले, की शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळ्यात पाश्चात्य देशातील नागरिक किल्ल्यावर आले होते़ त्यांना आम्ही विचारले तुम्ही या ठिकाणी का आलात, तर त्यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुण्यस्थानला मुजरा करण्यासाठी आम्ही आलो आहोत. यावरूनच शिवाजीमहाराजांची ख्याती असून भारतात नव्हे तर सर्व देशांमध्ये युद्धनीती अभ्यासली जात आहे, ही आपल्या दृष्टीने गौरवाची बाब आहे़ याप्रसंगी आशाताई बुचके, ललिता चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब गुंजाळ, अशोक गांधी, सुंदराताई कुऱ्हाडे, खंडू मेहेत्रे, किसन डेरे, अक्षय बोऱ्हाडे, डॉ. एम. बी. भोर, किरण सोलाट, योगेश (बाबू) पाटे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ ज्ञानेश्वर औटी, मेहबूब काझी, हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले, तर बाळासाहेब पाटे यांनी आभार मानले़ (वार्ताहर)